31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेचा निर्णय द्या : ‘सर्वोच्च निर्णय’


Give decision on MLA disqualification by December 31 : ‘Supreme decision’ नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या वेळापत्रकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार अपात्रतेप्रकरणी आता 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याची डेटलाईन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला राज्यातील राजकीय गणितं बिघडू किंवा वेगळीच घडू शकतात, असे एकूणच दिसून येत असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा व्यक्ती केली नाराजी
सर्वोच्च न्यायालयाने गतवेळच्या सुनावणीत आदेश दिल्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी सोमवारी सुधारीत वेळापत्रक सादर करताच न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. हे वेळापत्रकही वेळखाऊ असल्याने सर्वोच्च न्यायालयाने आता डेडलाईनच देत 31 डिसेंबर ही अखेरची तारीख दिली आहे.





न्यायालयाने नार्वेकरांचे वेळापत्रक केले अमान्य
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांबाबत न्यायालयात सोमवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे नवीन वेळापत्रक अमान्य करत आता 31 डिसेंबरची तारीखच दिली आहे. नार्वेकर यांनी दिलेले सुधारित वेळापत्रक हे ही सुनावणी आणखी सहा महिने वाढवणारे असल्याने न्यायालयाने हे वेळापत्रक मान्य केले नाही. अध्यक्षांनी 31 डिसेंबपर्यंत याप्रकरणी सुनावणी घेऊन आदेश द्यावेत, असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे निर्देश दिले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे आता अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट असून त्यानंतर सरकारचे भवितव्यदेखील समोर येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !