आठशे रुपयांची लाच भोवली : संगमनेरचा लाचखोर फौजदार एसीबीच्या जाळ्यात

Bribe of eight hundred rupees Bhovali : Bribery Faujdar of Sangamaner in ACB’s net संगमनेर : फटाका स्टॉलसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती आठशे रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब मधुकर यादव (53) यांना अहमदनगर एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड भीती पसरली आहे.
असे आहे लाच प्रकरण
निंबाळे, ता.संगमनेर येथील 20 वर्षीय तक्रारदार यांना दीपावली सणानिम्त्ति निंबाळे गावात फटाका स्टॉल चालू करण्याकरिता संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे ना हरकत प्रमानपत्र आवश्यक होते. त्यासाठी तक्रारदार हे संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर मंगळवारी फौजदार बाळासाहेब यादव यांनी एक हजारांची लाच मागितली व आठशे रुपये देण्यावर तडजोड झाली. तक्रारदााला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली.

पोलिस ठाण्यातच स्वीकारली लाच
संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखा कक्षात यातील फौजदार यादव यांनी तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. संगमनेर शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अहमदनगर एसीबीचे पोलिस उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि. पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, राधा खेमनर, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक, चालक हरून शेख आदींच्या पथकाने यशस्वी केला.
