एक कोटींची लाच घेताना अहमदनगर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा लाचखोर सहाय्यक अभियंता नाशिक एसीबीच्या जाळ्यात

राज्यातील सर्वात मोठी कारवाई ः नाशिक एसीबीच्या धडक कारवाईचे राज्यभरात कौतुक


Ahmednagar Maharashtra Industrial Development Corporation’s bribe-taking assistant engineer nabbed by Nashik ACB while taking bribe of one crore नाशिक : अहमदनगर एमआयडीसीत केलेल्या मागील कामांचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात तसेच अनामत परत करण्याच्या बदल्यात एक कोटींची लाच बक्षीस स्वरूपात मागून ती स्वीकारताना अहमदनगर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता किशोर गायकवाड यास एक कोटींची लाच स्वीकारताच नाशिक एसीबीने अटक केली. शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वाधिक अधिक लाच रक्कम स्वीकारण्यात आल्याची ही कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले. अत्यंत गोपनीय पद्धत्तीने शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, लाच प्रकरणात तत्कालीन उपविभागीय अभियंता तसेच सध्या धुळ्यात कार्यकारी अभियंता असलेल्या गणेश वाघ यांनादेखील आरोपी करण्यात आले असून ते पसार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

असे आहे लाच प्रकरण
या प्रकरणात 58 वर्षीय तक्रारदार आहेत. त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीत 1000 एमएम व्यासाची लोखंडी पाईपलाईन बदलण्याचे कामाचे मंजूर निविदेनुसार 31 कोटी 57 लाख 11 हजार 995 रुपयांचे पाच टक्के रकमेप्रमाणे एक कोटी 57 लाख 85 हजार 995 (पाच टक्केप्रमाणे) व अनामत रक्कम एक कोटी 57 लाख 85 हजार 995 रुपये तसेच या कामाचे सुरुवातीची सुरक्षा ठेव रक्कम 94 लाख 71 हजार 500 रुपये तसेच झालेल्या कामाचे अंतिम देयक 14 लाख 41 हजार 749 असे एकूण दोन कोळी 66 लाख 99 हजार 244 रुपये तक्रारदार यांना मिळावे यासाठी आरोपी गणेश वाघ यांचा मागील तारखेचे आऊट वर्ड करून त्यावर वाघ यांच्या सह्या घेऊन हे देयक त्यांच्याकडे पाठविण्याचा मोबदल्यात आरोपी किशोर गायकवाड यांनी स्वतः साठी तसेच गणेश वाघ यांच्यासाठी व यापूर्वी अदा केलेल्या बिलांचे बक्षीस म्हणून एक कोटींची लाच 20 ऑक्टोबर 2023 रोजी मागितली व लाच ठरल्याप्रमाणे रक्कम देण्याचा दिवस शुक्रवार,
3 नोव्हेंबर निश्चित करण्यात आला.

लाच स्वीकारताच केली अटक
शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नगर-छत्रपती संभाजी नगर रोडवरील शेंडी बायपास येथे सापळा रचण्यात आला. संशयित गायकवाड हा रोडच्या बाजूला असलेल्या आनंद सुपर मार्केटच्या मोकळ्या जागेत वाहन (एम.एच.20 सी.आर.7777) मधून आला. लाच स्वीकारल्यानंतर तक्रारदाराने इशारा देता एसीबीच्या नाशिक येथील पथकाने त्यास अटक केली. दरम्यान, आरोपी गायकवाड याने यावेळी साथीदार तथा अभियंता गणेश वाघ याला एकाच पाकिटाच लाच मिळाल्याचे सांगत 50 टक्के रक्कम कुठे पोहोच करायची ? असे फोनवरून विचारले असता वाघ याने तुझ्याकडे सेफ कस्टडीत ठेव, असे सांगत लाचेला प्रोत्साहन दिल्याने दोघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार (रीडर) यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण आदींच्या पथकाने यशस्वी केला.


कॉपी करू नका.