जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांची दिवाळी होणार गोड : 27 महसुल मंडळातील 54 हजारांचा पीक विम्याचा मिळणार लाभ
Farmers of Jalgaon district will have a sweet Diwali : 54 thousand in 27 revenue circles will get benefit of crop insurance जळगाव : केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पिकविमा अंतर्गत 27 महसूल मंडळातील 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याची ग्वाही विमा कंपनीने दिल्याने शेतकर्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
54 हजार शेतकर्यांना ठरवले पात्र
जळगाव जिल्ह्यातील 77 हजार 832 केळी उत्पादक शेतकर्यांनी पीक विमा काढ. त्यापैकी कमी 53 हजार 951 केळी उत्पादक शेतकरी केळी पीक विम्यासाठी पात्र आहेत. कमी व जास्त तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील 86 महसूल मंडळांपैकी 55 महसूल मंडळे पात्र ठरली होती. गेल्या वर्षी लागवड झालेल्या केळीच्या लागवड क्षेत्राबाबत विमा कंपनीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्राची पडताळणी देखील करण्यात आली. पडताळणीनंतर जिल्ह्यातील 53 हजार 951 केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले आहेत.

दिवाळीपूर्वीच जमा होणार क्कम
राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-23 साठी राज्य हिस्स्याची 196 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देवून निधी वितरित केला होता. यामुळे जिल्ह्यातील रखडलेला पिक विमा नुकसान भरपाई लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा होवून शेतकर्यांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा निर्धार आहे.
21 दिवस पडला पावसाचा
जळगाव जिल्हयातील खरीप हंगामी सन 2023-24 पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत ज्या महसूल मंडळामध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला होता, अशा सुमारे 27 महसूल मंडळातील शेतकरी हे पिक विमा निकषाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अधिसूचित करून भरपाईसाठी पात्र ठरवले होते. पात्र महसूल मंडळातील विमा धारक शेतक-यांना विम्याच्या निकषाप्रमाणे 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करून थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा करावे, असे निर्देश दिलेले असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.
चार दिवसांच्या आत बँक खात्यावर येणार रक्कम
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्यासाठी सरसकट लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई रक्कम ही चार दिवसांच्या आत शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांना विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिले आहे. तापी महामंडळ येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शेतकरी तक्रार निवारण व पीकविमा समितीचे सीए. हितेश आगीवाल व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून एक हजार 96 कोटींचे नियोजन करण्यात आले असून लवकरच शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.







