आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रकृतीत बिघाड : आज मुंबईला हलवणार !


MLA Eknathrao Khadse’s health deterioration : will be moved to Mumbai today! मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची रविवारी मुक्ताईनगरात नियमित टुडी इको तपासणी केल्यानंतर त्यात काहीसे बदल आढळून आल्यानंतर त्यांना रविवारी दुपारी जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. जळगावात हृदयाशी निगडीत तपासण्या करण्यात येत असून सायंकाळी मुंबईत त्यांना हलवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सायंकाळी जळगाव येथून एअर अ‍ॅम्ब्युलन्स वा ट्रेनने ते मुंबईला जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जळगावात उपचार : प्रकृती मात्र स्थिर
राज्याचे हेवी वेट नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी रविवारी नियमित तपासणी मुक्ताईनगरात केल्यानंतर त्यात टूडी इकोमध्ये काहीसे बदल डॉक्टरांना दिसून आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना जळगाव येथील गजानन हार्ट केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या चमूकडून त्यांच्या हृदयाशी संबंधित सर्व चाचण्या करण्यात येत आहेत. आमदार खडसे यांची प्रकृती स्थिर असून हृदयविकार नसल्याचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते म्हणाले.

आज सायंकाळी मुंबईत हलवणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील याबाबतची माहिती कळवताच त्यांनी तातडीने एअर अ‍ॅम्ब्यूलन्सची व्यवस्था केली आहे. रविवारी सायंकाळी सात वाजता आमदार खडसे यांना मुंबईत हलवण्यात येणार आहे. यावेळी रुग्णालयात अ‍ॅड.रोहिणी खडसेदेखील उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मोठी गर्दी वाढली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !