खवैय्यांसाठी मोठी पर्वणी : भुसावळ शहरात केक स्टुडिओचा थाटात शुभारंभ
आमदार संजय सावकारे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती
Grand launch of cake studio in Bhusawal city भुसावळ : अस्सल खवैय्यांच्या जीभेचे लाड पुरवण्यासाठी शहरात डि क्रिओलो बेकर्सच्या सौजन्याने केक स्टुडिओचा शनिवार, 4 रोजी सकाळी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ करण्यात आला. भुसावळ शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राध्येश्याम लाहोटी यांनी फित कापून केक स्टुडिओचे उद्घाटन केले. भुसावळचे आमदार संजय सावकारे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी याप्रसंगी उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या.
काही मिनिटात ग्राहकांना मिळणार फ्रेश केक
केक स्टुडिओच संचालक शशिकांत मेहता म्हणाले की, केक स्टुडिओमध्ये आलेल्या ग्राहकांना फ्रेश व अत्यंत चवीष्ट केक उपलब्ध होणार आहे. ग्राहकांनी मागणी नोंदवताच त्यांच्या समक्ष केक तयार केला जाईल त्यामुळे फे्रश केकचा आनंद ग्राहकांना घेता येईल शिवाय ग्राहक आपल्या मर्जीनुसार हव्या त्या फ्लेव्हरमध्ये केकची मागणी नोंदणी शकतात अथवा कमी-जास्त क्रिम केकमध्ये हवी असल्यास ती सोयदेखील आम्ही उपलब्ध करून दिली आहे. भुसावळकर ग्राहकांचा आमच्या केक स्टुडिओला प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचे ते म्हणाले.

या मान्यवरांची उपस्थिती
शनिवारी सायंकाळी सहा वाजता भुसावळ व्यापारी संघाचे अध्यक्ष राध्येश्याम लाहोटी यांनी फीत कापून शुभारंभ केला. याप्रसंगी भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे, राजाभाऊ काबरा, रामभाऊ ओक, रेल्वेचे जीवन चौधरी, श्यामभाऊ दरगड, योगेश मांडे, विकास पाचपांडे, विजय अग्रवाल, गुड्डू अग्रवाल, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे आदींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांचे शशिकांत मेहता, चारूलता शशिकांत मेहता, कपिल मेहता, विधी मेहता, युवराज मेहता, कुंजीका मेहता व मेहता परीवाराने यावेळी आदरातिथ्य करीत स्वागत केले.

बेकरी प्रोडक्टसह सर्व काही एकाच छताखाली
भुसावळातील खवैय्या ग्राहकांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी केक स्टुडिओमध्ये बेकरी प्रोडक्टस चॉकलेटस केक, स्नॅस, फ्रुट केकस उपलब्ध करून देण्यात आले आहेत शिवाय वरील सर्व प्रकारात विविध व्हरायटीदेखील उपलब्ध असल्याचे केक स्टुडिओचे संचालक शशिकांत मेहता म्हणाले.
केक स्टुडिओमध्ये विविध प्रकारचे केकस, पेस्ट्री, मफीन्स, कप केकस, टोस्ट, खारी, कुकीज, डिझाईनर केक, डोनटस फ्रेश स्वरूपात उपलब्ध असणार आहेत. भुसावळकरांनी एक वेळ सेवेची संधी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






