वन डे विश्वचषकात भारताचा ‘विराट’ विजय

शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला विराट कोहली


India’s ‘Virat’ wins in ODI World Cup नवी दिल्ली : भारतीय संघाने वनडे विश्वचषकात सलग आठवा विराट विजय नोंदवला आहे. गुणतालिकेत क्रमांक-1 फिनीशही निश्चित केली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना चौथ्या क्रमांकावरील संघाशी होईल. भारताने कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. विराट कोहलीच्या विक्रमी 49व्या शतकामुळे संघाने 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. कोहलीने नाबाद 101 धावा केल्या आणि सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. श्रेयस अय्यरने 77 धावा केल्या.





83 धावांवर दक्षिण आफ्रिकेचा संघ गारद
दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.1 षटकांत 83 धावा करून सर्वबाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. मोहम्मद शमीने 2 तर कुलदीप यादवने 2 बळी घेतले. भारताने 20 वर्षांनंतर विश्वचषकात सलग आठ सामने जिंकले आहेत. यापूर्वी टीम इंडियाने 2003 वर्ल्ड कपमध्ये एकामागून एक 8 सामने जिंकले होते.

विश्वचषकात शतक झळकावणारा पहिला भारतीय
विराट कोहलीने 121 चेंडूत नाबाद 101 धावांची शतकी खेळी केली. त्याने सचिन तेंडुलकरच्या वनडेत सर्वाधिक शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. कोहली आपल्या वाढदिवशी विश्वचषकात शतक झळकावणारा भारताचा पहिला आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !