माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसेंवर मुंबईत उपचार
हृदयाचा त्रास : रात्री एअर अॅम्ब्युलन्सने हलवले : बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार
Former Revenue Minister MLA Eknathrao Khadse undergoing treatment in Mumbai भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जळगाव येथून एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत हलवण्यात आले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती निकटवर्तीय प्रा.सुनील नेवे यांनी दिली.
दरम्यान, आमदार खडसे यांना दोन दिवसांपासून जळजळ होत असल्याने रविवारी त्यांची मुक्ताईनगरात नियमित टुडी इको तपासणी केल्यानंतर त्यात काहीसे बदल आढळून आल्यानंतर त्यांना रविवारी दुपारी जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. जळगावात हृदयाशी निगडीत तपासण्या करण्यात आल्यानंतर रात्री आठ वाजता एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटलला जळगाव येथून एअर अॅम्ब्युलन्सने हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आमदार खडसे यांची प्रकृती मात्र स्थिर
राज्याचे हेवी वेट नेते आमदार एकनाथराव खडसे यांना दोन दिवसांपासून छातीत जळजळ होत असल्याने त्यांची रविवारी नियमित तपासणी मुक्ताईनगरात केल्यानंतर त्यात टूडी इकोमध्ये काहीसे बदल डॉक्टरांना दिसून आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना जळगाव येथील गजानन हार्ट केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.विवेक चौधरी व डॉक्टरांच्या चमूकडून त्यांच्या हृदयाशी संबंधित सर्व चाचण्या करण्यात आल्या. डॉ.चौधरी म्हणाले, आमदार खडसे यांचा रक्तदाब नियमित असून चेस्ट इन्फेक्शनचे उपचार मुंबईत केले जाणार आहेत. प्रकृती अत्यंत स्थिर असून घाबरण्याचे कुठलेही कारण नाही.
रात्री आठ वाजता मुंबईत हलवले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील याबाबतची माहिती कळवताच त्यांनी तातडीने एअर अॅम्ब्यूलन्सची व्यवस्था केली रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आमदार खडसे यांना मुंबईत हलवण्यात आले. यावेळी अॅड.रोहिणी खडसे, भुसावळचे माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे व पदाधिकारी उपस्थित आहेत.






