आमदार एकनाथराव खडसे यांची खासदार शरद पवारांनी घेतली भेट
MP Sharad Pawar met MLA Eknathrao Khadse मुंबई : राज्याचे हेवी वेट नेते तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांना प्रकृती अस्वास्थानंतर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात रविवारी रात्री हलवण्यात आल्यानंतर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जावून भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. यावेळी मंदाकिनी खडसे व डॉ.अभिषेक ठाकुर यांनी शरद पवारांना तब्येतीविषयी माहिती दिली.
आमदार खडसेंना रात्रीच हलवले मुंबईत
राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना रविवारी हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर त्यांना जळगाव येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तेथे काही तपासण्या व प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईत एअर अॅम्ब्युलन्सने हलविण्याच्या निर्णय घेण्यात आला व रात्री आठ वाजेच्या सुमारास आमदार खडसे यांना मुंबईत हलवण्यात आले.

खासदार शरद पवारांनी जाणली माहिती
शरद पवार यांनी सोमवारी सकाळी रुग्णालयात जावून खडसेंची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. यावेळी मंदाकीनी खडसे व एकनाथ खडसे यांचे खासगी डॉ.अभिषेक ठाकुर यांनी शरद पवारांना तब्येतीविषयी माहिती दिली. एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, अशी माहिती खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी दिली.
सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
शरद पवार यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनीदेखील रुग्णालयात जावून आमदार एकनाथ खडसेंशी चर्चा करीत उपस्थितांकडून प्रकृतीची माहिती जाणली.






