चाळीसगाव तालुक्यात आमदार मंगेश चव्हाणांची चालली जादू : 12 ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकला
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटासह महाविकास आघाडीला दे धक्का ः चाळीसगाव तालुक्यातील 12 पैकी 12 ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात
MLA Mangesh Chavan’s magic in Chalisgaon taluka : BJP flag hoisted on 12 Gram Panchayats चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरू आहे. रविवार झालेल्या 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून बिनविरोध झालेल्याी 1 ग्रामपंचायतीसह 12 पैकी 12 ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. राष्ट्रवादी शरद पवार गटासह शिवसेना उबाठा गट व काँग्रेस पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही.
आता ग्रामपंचायत निवडणुकीतही मारली बाजी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या यशानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला व महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का देण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी गटनेते शशिकांत साळुंखे यांच्या खेडगाव गावातील पॅनलचा धुव्वा उडवत भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार उषाबाई मरसाळे विजयी झाले आहेत तर सदस्य पदांवर देखील 11 पैकी 9 उमेदवार भाजपा पुरस्कृत पॅनलचे निवडून आल्याने भाजपचे निर्विवाद वर्चस्व खेडगाव ग्रामपंचायतीवर सिद्ध झाल आहे.

होत पीचवर धक्कादायक पराभव
खेडगाव येथील पराभूत पॅनलचे नेतृत्व करणारे शशिकांत साळुंखे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जुने नेते असून गेली अनेक वर्ष जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीत त्यांचे वर्चस्व राहिले होते. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत त्यांच्या मुलाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते, त्यांनतर त्यांच्या होम पिचवर ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे.
खेडगाव येथील भाजपा पुरस्कृत पॅनलचे नेतृत्व भाजपचे अविनाशनाना चौधरी, रावसाहेब साळुंखे, के.बी.दादा साळुंखे, पांडुरंग महाजन, सुकलाल माळी, छोटू पाटील, यांनी केले होते. विशेष म्हणजे सदर पॅनलचा प्रचार शुभारंभ आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते नारळ फोडून करण्यात आला होता. त्यामुळे खेडगाव गावातील निवडणूक हायव्होल्टेज होणार असल्याच्या चर्चा सुरुवातीपासून होत्या.
भाजपची सत्ता असली तरच विकास होऊ शकतो हा जनतेला विश्वास : आमदार मंगेश चव्हाण
ग्रामपंचायत निवडणूक ही ग्रामीण भागातील महत्वाची निवडणूक मानली जाते, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चाळीसगाव तालुक्यातील सर्वच्या सर्व 12 जागांवर भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृत पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर परिवारातील सदस्य म्हणून गेली 4 वर्ष जनतेच्या अडीअडचणी व सुखदुःखात सोबत राहिलो आहे तसेच गावागावात विकासकामे देताना कधीही भेदभाव न केल्याची ही पावती आहे अस मी मानतो.
यासोबतच राज्यात दीड वर्षांपूर्वी आलेल्या भाजपा महायुती सरकार व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा योजनेची शेकडो कोटींची विकासकामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची 100 किमी हुन अधिक लांबीचे रस्ते यांची कामे प्रत्यक्षात सुरू झाल्याने जनतेचा भाजपा प्रति विश्वास अधिक वृद्धिंगत झाला. त्यामुळे भाजपा विचारांचा सरपंच असला व ग्रामपंचायत वर भाजपचे बहुमत असले तर अधिक जोमाने गावाचा विकास होऊ शकतो हा ठाम विश्वास ग्रामीण भागात निर्माण झाल्याने त्यांनी सर्व ठिकाणी भाजपला पसंती दिली आहे.
पराभूत उमेदवारांनी गावाच्या विकासासाठी साथ द्यावी : आमदार
मी सर्व मतदारांचे आभार मानतो, विजयी सरपंच व सदस्यांचे मनापासून अभिनंदन करतो तसेच ज्यांचा पराभव झाला त्यांनी खचून न जाता गावाच्या विकासासाठी जागल्याची भूमिका घेत चांगल्या कामांना साथ द्यावी व जोमाने कामाला लागावे, असे आमदार मंगेश रमेश चव्हाण म्हणाले.






