भुसावळ शहरात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिला उद्योजक मेळावा

Women entrepreneurs meeting organized by Pratishtha Mahila Mandal in Bhusawal भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षप्रमाणे यंदाही येथील ब्राम्हण संघात महिला उद्योजक मेळाव्याचे 3 ते 5 नोव्हेंबर या काळात आयोजन करण्यात आले. यात 90 महिला उद्योजकांनी सहभाग घेतला. महिलांनी स्वतः तयार केलेल्या विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, दिवाळीचा फराळ, साड्या, ज्वेलरी, घरात लागणारे विविध प्रकारचे साहित्य, वस्तू तसेच विविध प्रकारचे फराळाचे स्टॉल लावण्यात आले होते.
12 वर्षांपासून मेळाव्याचे आयोजन
शहरातील ब्राह्मण संघात या मेळाव्याचे उद्घाटन डॉ.नीलिमा चौधरी, माजी नगरसेविका सोनल महाजन, प्रीतमा महाजन, दीपाली बर्हाटे, शैलजा नारखेडे, कठोरा सरपंच रोहिणी पाटील, भाजन महिला आधाडी शहराध्यक्ष अनिता आंबेकर यांच्याहस्ते करण्यात आले. डॉ.नीलिमा चौधरी यांनी प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे गेल्या 12 वर्षांपासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन करीत असल्याने मंडळाचे कौतुक केले. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले. या कार्यक्रमाला आमदार संजय सावकारे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अनिता आंबेकर, सोनल महाजन, जयश्री चौधरी, वैशाली सैतवाल, राजश्री बादशाह, मनीषा काकडे यांनी परीश्रम घेतले.
