अ.भा.संत समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज


Saint Shri Gopal Chaitanyaji Maharaj as Maharashtra Pradesh President of A.B.Sant Samiti
पाल, ता.रावेर :
परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींचे कृपापात्र शिष्य व अखिल भारतीय चैतन्य साधक परीवार श्री वृंदावन धाम, पाल आश्रमाचे पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांची अखिल भारतीय संत समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तीर्थक्षेत्र वाराणसी (काशी) येथे आयोजित अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय आखाडा परीषद, गंगा महासभा, दैनिक जागरण, काशी विद्वत परीषद यांच्या संयुक्त विद्यामने चार दिवसीय संस्कृती संसद संत संमेलन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यात भारतातून हजारो संतांच्या उपस्थितीत व सिक्किमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, आखाडा परीषदेचे अध्यक्ष रविंदरपुरीजी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य जगद्गुरु अविचलदेवाचार्यजी महराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी समितीचे राष्ट्रीय महामंत्री जितेंद्रानंदजी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे संयुक्त महामंत्री महामंडलेश्वर राधे राधे बाबा आदींसह देशभरातील हजारो संत-महंत महामंडलेश्वर जगद्गुरु उपस्थित होते.


महान कार्याची दखल घेत निवड
ब्रम्हलीन प.प.संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींचे कृपापात्र शिष्य श्रद्धेय संत श्री चैतन्य गोपाल चैतन्यजी महाराज यांनी गुरुवर्य पूज्य बापूजी यांच्या ब्रम्हलीनानंतर त्यांच्या प्रेरणेने व अखिल भारतीय चैतन्य साधक परीवाराच्या सहयोगाने सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले लाखो आदिवासी बांधवासह भाविकांना अध्यात्मिक क्षेत्रात आणून शुद्ध शाकाहार जीवन व अंधश्रद्धा मुक्तीचे अनमोल कार्य केले आहे. या महान कार्याची पावती म्हणून त्यांना अ.भा.संत समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद बहाल करण्यात आले. यामुळे अखिल भारतीय चैतन्य साधक परीवारात चैतन्यमय आनंदित वातावरण निर्माण झाले असून सगळीकडून कौतुक करण्यात येत आहे. प्रसंगी पूज्य बापूजींचे कृपापात्र शिष्य श्याम चैतन्य महाराज (जामनेर) व पाल आश्रमातून दिव्य चैतन्य महाराज, शिव चैतन्य महाराज, ब्रज चैतन्य महाराज, सर्व चैतन्य महाराज व हजारो संत-महापुरुष, अनेक धर्माचार्य, अनेक संप्रदायाचे मंडलेश्वर-महामंडलेश्वर यांची प्रामुख्याने विशेष उपस्थिती होती.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !