रावेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण रक्ताला मतदारांनी दिली संधी
रावेर : रावेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. काही ठिकाणी अपेक्षितांना धक्का बसला तर तरुणाईची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात एंट्री झाली. सोमवारी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार बी.ए.कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या निरीक्षणाखाली मतमोजणीला तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला. चिनावल, उटखेडा, कळमोदा, खिर्डी बुद्रुक, रोझोदा, थेरोळा या गावातील सरपंच पदासाठी अतिशय अटीतटीची व चुरशीची निवडणूक झाली. सहा फेर्यांमध्ये मतमोजणी झाली.पोलिस निरीक्षक कैलास नागरे, फौजदार सचिन नवले, विजय जावरे आणि सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
ग्रामपंचायतनिहाय विजयी सरपंच व सदस्य असे
उटखेडा ग्रामपंचायत- सरपंच- कुंदन सुरेश महाजन, सदस्य- सुधाकर गोविंदा पाटील, नलूबाई इच्छाराम धनगर, महेंद्र सुधाकर महाजन, चंद्रभागा अरुण तायडे, अरुणा हरीश्चंद्र महाजन, जुगाराबाई इदू तडवी, वैशाली जितेंद्र चौधरी


चिनावल ग्रामपंचायत- सरपंच- ज्योती संजय भालेराव, सदस्य- प्रियंका मोहन पाटील, प्रियंका कुंदन बोरोले, ठकसेन भास्कर पाटील, अंजली नितीन भालेराव, सागर नीलकंठ चौधरी, जितेंद्र सोनजी नेमाडे, शेषराज दिनकर भालेराव, कविता गिरीश नारखेडे, सागर गोपाळ भारंबे
खिर्डी बुद्रुक ग्रामपंचायत- सरपंच- संगीता भास्कर पाटील, सदस्य- शेख शकील शेख बशीर, निता रवींद्र कोचुरे, वहिदाबी रऊफ खाटीक, महेंद्र मधुकर कोचुरे, धीरेंद्र सुभाष पाटील, अतुल प्रभाकर पाटील, सुवर्णा चंद्रजीत पाटील, गणेश मनोहर देवगिरकर, ज्योती ज्ञानेश्वर बोन्डारे, देवकाबाई सीताराम महाजन,
कळमोदा ग्रामपंचायत- सरपंच- प्रशांत हरीचंद्र जावळे, सदस्य- राजू नसीर तडवी, रुपाली पंकज वाघ, पल्लवी योगेश बोंडे, कुर्बान नामदार तडवी, योगेश भगवान जावळे, शबाना तडवी, नरेश रामकृष्ण पाटील, तायरा अमित तडवी, शहानुर तडवी
रोझोदा ग्रामपंचायत- सरपंच- पुष्कर लक्ष्मण फेगडे, सदस्य – चेतन पंडित भारंबे, आम्रपाली रवींद्र मेढे, खिलचंद सुपडू धांडे, पूजा मयूर कोल्हे, सुनीता गणेश कोळी, गिरीश कमलाकर पाटील, प्रियंका पुष्कर फेगडे नारायण विष्णू राणे, निखिल सुभाष सरोदे, भावना अमोल धांडे,
विटवा-सांगवे गृप ग्रामपंचायत- सरपंच- मुकेश विश्वनाथ चौधरी, सदस्य- गणेश मधुकर मनुरे, रुपाली गजानन कोळी, सुशिलाबाई लक्ष्मण मनुरे, साहेबराव विकास वानखेडे, निर्मला सुरेश कोळी
अभोडा ग्रामपंचायत- सरपंच- अल्लाउद्दीन हैदर तडवी, सदस्य- महेमूद सिकंदर तडवी, फातिमा कादर तडवी, लयाबाई धनराज पवार, विनोद भागवत तायडे, अपशान दिलदार तडवी, जोहराबाई रहेमान तडवी, चांदखा तडवी, ईश्वर छगन पवार, जरीना जुम्मा तडवी
मांगी चुनवाडे ग्रामपंचायत- सरपंच- ईश्वर अशोक कोळी, सदस्य- मुरलीधर रामदास पाटील, दीपाली निलेश कोळी, अर्चना योगेश कोळी, विकास सुरेश पाटील, वैशाली ज्ञानेश्वर कोळी, पवन एकनाथ तायडे
आंदलवाडी ग्रामपंचायत- सरपंच- विनायक दुर्योधन कोळी, सदस्य- रत्नमाला दिलीप तायडे, कडू वाघो तायडे, प्रतिभा सूर्यभान तायडे.
शिंगाडी ग्रामपंचायत- सरपंच- दीपक धर्मराज सोनवणे, सदस्य- सीमा भूषण कोळी, रामचंद्र बालचंद चर्हाटे
थेरोळा ग्रामपंचायत- सरपंच- शुभम पुंडलिक पाटील, सदस्य- ईश्वर भागवत अटकाळे, अशोक भास्कर पाटील, अनुसया वसंत अटकाळे
वाघोदा खुर्द ग्रामपंचायत- सरपंच- दीपाली जितेंद्र चौधरी, सदस्य- पीरान हसन कुलकर्णी, जितेंद्र सुरेश चौधरी, वंदना दिलीप कोलते, संदीप रामकृष्ण कोलते, सत्तर तुराबी पटेल.





