भुसावळात तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा ; आमदार संजय सावकारे किंग मेकर

पाच ग्रामपंचायतींवर भाजपाचा दावा : निकालानंतर उमेदवारांसह समर्थकांचा जल्लोष


BJP’s upper hand in Gram Panchayat elections in Bhusawalat taluka; MLA Sanjay Savkare King Makerभुसावळ  : भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी निवडणूक तर दोन ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात रविवारी पोटनिवडणूक झाली. सोमवार, 16 रोजी भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या दिड तासात निकाल हाती आले. ग्रामपंचायतीत पक्ष नसलातरी पाच ग्रामपंचायतीसह तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने विजय मिळवल्याचा दावा केला आहे तर फुलगावात अपक्ष तर गोजोर्‍यात मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवल्याचे सूत्रांनी सांगितले. निकालानंतर उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला. भाजपाला मानणार्‍या विजयी उमेदवारांचा भुसावळातील आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात आमदारांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

अवघ्या दिड तासात निकाल हाती
भुसावळ तहसील कार्यालयाच्या पोर्चमध्ये सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरूवात करण्यात आली. अवघ्या दिड तासात निकाल हाती आले. उद्घोषणेनंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून टाळ्या व शिट्या वाजवून जल्लोष करण्यात येत होता. तहसील आवाराबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त राखला. भुसावळ तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार शोभा घुले, महसूल सहाय्यक भगवान शिरसाठ, सहाय्यक जितेश चौधरी, योगेश मुस्कावाड आदींनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले.


भाजपाने केला पाच ग्रामपंचायतींवर दावा
ग्रामपंचायतींच्या निवडणुका भलेही पक्ष चिन्हावर झाल्या नसल्यातरी सात पैकी पाच ग्रामपंचायतींवर भाजपाने आपला दावा केला आहे. त्यात चोरवड, वराडसीम, सुनसगाव, अंजनसोंडे, गोजोरे तसेच तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने यश मिळवल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. या ग्रामपंचायतीत यश मिळवलेल्या लोकनियुक्त सरपंचांसह सदस्यांचा आमदारांच्या संपर्क कार्यालयात जंगी सत्कार करण्यात आला. दरम्यान, फुलगाव येथे मात्र अपक्षांची जादू चालली तर विल्हाळे येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली.

ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार असे
अंजनसोंडे-
सरपंच- रामराव पंढरीनाथ पाटील (419), सदस्य- आशा वसंत सुरवाडे (204), तेजश्री नरेंद्र कोळी (231), भूषण अरुण तायडे (बिनविरोध), सुरेखा मधुकर चौधरी (बिनविरोध), नरेंद्र मधुकर कोळी (बिनविरोध), विनायक कडू चौधरी (बिनविरोध)

गोजोरे- सरपंच- नंदा लक्ष्मण कोळी (1067), सदस्य- चंद्रकांत सोपान पाटील (219), निर्मला शालिक दोडे (399), लताबाई अनिल पाटील (347), ज्योत्स्ना मोहन तळेले (बिनविरोध), तानाजी सुखदेव पाटील (226), सुरेखा रवींद्र कोळी (214), भास्कर सुभाष दोडे (334), आशाबाई दत्तात्रय दोडे (237), विशाल सुनील सोनवणे (284)

विल्हाळे- सरपंच- लक्ष्मण शारदा कोल्हे (688), सदस्य- देवानंद मधुकर सुरवाडे, हेमंत रामदास पाटील (244), ललिता जितेंद्र ठोके (266), सुरेखा विलास सुरवाडे (223), शारदा लक्ष्मण कोल्हे (271), नितीन सुखदेव सुरवाडे (218), संध्या योगेश पाटील (222), ललिता विजय पाटील (201)

सुनसगाव- काजल भोजराज कोळी (392), शामराव महारू मालचे (233), वैशाली युवराज पाटील (301), रत्नपप्रभा विकास पाटील (280), एकनाथ फुलसिंग सपकाळे (229), गायत्री राहुल नारखेडे (333), चंद्रकांत नामदेव पाटील (188), शोभा रामचंद्र शिरसाळे (बिनविरोध), सुनील परशुराम कंकरे (272), रंजना सुधाकर पाटील (475)

चोरवड- सरपंच- पुरूषोत्तम विजयसिंग महाजन (824), सदस्य- अनिता रवींद्र गुंजाळ (230), उषा गजानन ठाकरे (197), विरेंद्रसिंग प्रल्हादसिंग पाटील (224), गोमा भगत भील (210), छाया डिगंबर गोलांडे (268), प्रवीण नथ्थू गुंजाळ (228), कविता मयूर पांढरे (437), मोहिनी मोहनसिंग चौधरी (514), पल्लवी हरजितसिंग भोळे (547)

वराडसीम- सरपंच- निलप्रभा उमेश पाचपांडे (1382), शरद प्रभाकर सपकाळे (228), ईरफान सलीम खाटीक (446), निर्मला नाना चौधरी (357), विलास रामदास पाटील (209), जया रवींद्र पारधी (355), आशा विजय कोळी (342), दीपक मोरेश्वर ढाके (333), सुरेखा एकनाथ खाचणे (240), प्रकाश देविदास ठाकूर (245), वैशाली दीपक झारखंडे (159), विजय रवींद्र पाटील (319), लक्ष्मी विजय डोळसे (205), सुनीता विजयसिंग पाटील (259)

फुलगाव- सरपंच- शाम सुरेश फुलगावकर (785), हेमलता आशिष शिंदे (217), श्रीकृष्ण सुकलाल वाघ (बिनविरोध), सचिन शशिकांत पाटील (318), कविता भूषण चौधरी (255), मीनाक्षी प्रवीण बाऊस्कर (233), सिद्धांत राजेंद्र चौधरी (257), सुलोचना विजय भालेराव (234), मनोज विश्वनाथ कोलते (318), भारती दिनेश चौधरी (393), पुष्पा निळकंठ चौधरी (270)

पोटनिवडणूक- शिंदी- शालिग्राम दगडू कोळी (सरपंच बिनविरोध), सुनीता संदीप सपकाळे (बिनविरोध), मांडवेदिगर- गुड्डीबाई संभाजी पवार (274), हतनूर- लक्ष्मी जंगलसिंग पवार (220)








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !