डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर 10 रोजी भुसावळ शहरात
Dr. Babasaheb Ambedkar’s great grandson Sujat Ambedkar on 10th in Bhusawal city भुसावळ : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) हे शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 रोजी भुसावळ शहराच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भुसावळात जिल्हास्तरीय मेळावा
शुक्रवारी भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन शेजारील कृष्णचंद्र सभागृहात सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन युवा आघाडीचा जिल्हास्तरीय मेळावा होईल. जिल्ह्यातील असंख्य युवा कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा यावेळी होईल. सायंकाळी सहा वाजता भुसावळ शहरातील पंचशील नगरातील धम्मदीप बौद्ध विहाराचे लोकार्पण व बुद्धमूर्ती स्थापना सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.


याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, चेतन गांगुर्डे, शमिभा पाटील यांचीदेखील उपस्थिती असेल. जळगाव जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांनी व समाजबांधवांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थिती द्यावी, आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी केले आहे.





