विविध मागण्यांसाठी रेल्वे व्यवस्थापकांना भुसावळात रेल्वे कामगार सेनेचे साकडे


Railway Workers’ Union demands in Bhusawal to Railway Managers for various demands भुसावळ : छत्रपती शिवरायांचा पुतळा डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसवावा यासह विविध न्याय मागण्यांसाठी रेल कामगार सेनेतर्फे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांना निवेदन देण्यात आले. भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर ललवाणी आल्यानंतर त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डीआरएम इती पांडे. कौशलेंद्रकुमार, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, कार्याध्यक्ष प्रीतम टाक, संयुक्त सचिव विनोद वाघे, खजिनदार योगेश माळी, उपाध्यक्ष मोहन राजपूत, सहसचिव राजीवकुमारसिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या मागण्यांबाबत निवेदन
डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा, रेल्वे दवाखान्यात व्हेंटीलेटर, सोनोग्राफी,स् पेशालिस्ट डॉक्टरची भरती, रुग्णांसाठी रेल्वे रीझर्वेशन खिडकी, रक्तपेढीची व्यवस्था करावी तसेच रात्रपाळी पेट्रोलिंगसाठी ट्रॅकमॅनची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली. पॉईंटसमनची ड्युटी आठ तास करावी, एमओएच रनिंग शेडमध्ये सुविधा देण्यात याव्यात यासह विविध मागण्यांबाबत जीएम यांना निवेदन देण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !