शेतकर्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती करावी
जिल्हा अधीक्षक आर.बी.चलवदे : रावेरात शेतकरी मेळावा
Farmers should take advantage of the schemes of Agriculture Department and progress रावेर : केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आर.बी.चलवदे यांनी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. रावेर कृषी विभाग, रावेर तालुका ड्रिप डिलर असोसिएशन, ठिबक उत्पादक कंपनी, कृषी यंत्र व औजारे, ट्रॅक्टर उत्पादक व विक्रेते, बँकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रावेरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी.चलवदे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, युवा नेते धनंजय चौधरी, प्रगतीशील शेतकरी भागवत पाटील, रावेर तालुका ड्रिप डिलर असोसिएशन अध्यक्ष सोपान साहेबराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गणवाणी, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान बाबूराव पाटील, आर.जी.पाटील उपस्थित होते.


शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग उभारा
आधुनिक काळात शेती करतांना यंत्राची आवश्यकता असते. शेती यंत्राया सहाय्याने केल्याने शेतीच्या कामाला गती येईल त्यामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण करता येतील. यासाठी बँकानी शेतकर्यांना शेती उपयोगी यंत्र सामग्रीसाठी कर्ज देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. केळी भावातील घसरणीमुळे अनेकदा शेतकर्यांचे नुकसान होते. यावर मात करण्यासाठी शेतकर्यांनी शेती आधारीत प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शासन विविध योजना आहेत. त्याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा.
केळी विम्याची रक्कम दिवाळी पूर्वी
शेतकर्यांना केळी विम्याची रक्कम मिळावी यासाठी शासकीय पातळीवर दररोज वेगवेगळ्या पातळीवर बैठका सुरू आहेत. दिवाळीपूर्वी पात्र लाभार्थींना केळी विम्याची रक्कम मिळेल, अशी आशा जिल्हा कृषी अधिकारी चलवदे यांनी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी आर.जी.पाटील, गुलाब पाटील, प्रभाकर पाटील, सुनील कोंडे, अमोल पाटील, घनश्याम पाटील, विकास कुंभार, प्रशांत गुरव, डी.डी.वाणी, निलेश पाटील, संतोष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.





