वीटभट्टी कामगारांच्या मुलांचे चेहर्यावर फुलले हास्य : भुसावळातील ईनरव्हीलने दिवाळी केली गोड
Smiles on the faces of children of brick kiln workers: Innerwheel in Bhusawal made Diwali sweet
भुसावळ : शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये शिक्षण घेणारी मुले बहुतांश वीटभट्टी कामगारांची मुले आहेत. ही शाळा इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने दत्तक घेतली आहे.
दिवाळी हा सण या मुलांनी सुद्धा आनंदात साजरा करावा या उद्देशाने क्लबने या मुलांसाठी दिवाळी फराळ व फटाक्यांची भेट दिली. शेव-चिवडा, लाडू, टिकली रोल, बंदूक, फूलबाजी पाकिटे, आपटी बार पाकिटांची भेट चिमुकल्यांना देण्यात आले. या प्रोजेक्टसाठी क्लबसोबत अध्यक्षा रेवती मांडे व सदस्य वैशाली महाजन यांनी अर्थसहाय्य केले. प्रसंगी सचिव सीमा सोनार, डॉ.मृणाल पाटील, सुनीता पाचपांडे, आदिती भडंग, प्रतीक्षा पाटील, मोना भंगाळे, वनीता नेवे, जयश्री चौधरी, कोमल पाटील उपस्थित होत्या.







