भुसावळात दिवाळीनंतर थकबाकीदारांसह अतिक्रमण धारकांविरोधात मोहिम
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील : नाल्याचा प्रवाह अडवणार्यांना नोटीसा
District Magistrate Jitendra Patil : Notice to those blocking the flow of the drain भुसावळ : दिवाळी सणानंतर महामार्गावरील अतिक्रमणासह शहरातील विविध प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवून धडक मोहिम राबवण्यात येईल शिवाय थकबाकीदारांविरोधात दिवाळीनंतर कारवाईचे नियोजन असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा प्रशासक जितेंद्र पाटील यांनी दिली. भुसावळातील अयोध्यानगर-वांजोळा रस्त्याला जोडणार्या बोगद्याजवळ आणि त्याच्या जवळच्या दुसर्या बोगद्याजवळ मातीचा भराव करणार्या दोघांना जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनंतर नोटीस बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परीषदेत बुधवारी दुपारी दिली.
‘त्या’ एन ए प्लॉटची माहिती घेणार
महामार्गावरील अंडरपासजवळ मातीचा भराव करून पाण्याचा प्रवाह अडवून ठेवण्यात आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी फौजदारी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर प्रशासनो त्या परीसरातील दोन जणांना पालिकेच्या माध्यमातून नोटीसा बजावल्या जात असून त्या ज्यांनी जागा एनए करून प्लॉट विक्री केले त्यांनी सांडपाणी व्यवस्थापनाची नेमकी काय व्यवस्था केली याची ले आऊट पाहणी करून माहिती काढली जाईल व दोषींवर कारवाई केली जाईल, असेही प्रांताधिकारी म्हणाले.


दिवाळीनंतर निघणार अतिक्रमण
प्रांताधिकारी म्हणाले की, महामार्गावरील सर्वच अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा केला जाणार आहे. अतिक्रमणामुळे अपघात होत असल्याने या प्रकारांना निश्चित आळा बसेल शिवाय शहरात जेथे रस्ते, गटारी, वीज आणि धापे तयार करण्याची आवश्यकता असेल तेथे त्याची निर्मिती होईल. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने केली जातील. शहरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी वसुंधरा अभियान, स्वच्छ भारत योजनेद्वारे स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले. दिवाळीनंतर थकीत मालमत्ताधारकांविरोधात कायदेशीर कारवाई केली
जाणार असल्याचे प्रांताधिकारी म्हणाले.





