यावल तहसीलदारांची संवेदनशीलता : निराधार, वंचितांसोबत दिवाळी साजरी


Sensitivity of Yaval Tehsildars: Celebrating Diwali with the destitute, underprivileged यावल : यावल तहसीलदारांनी समाजाप्रती संवेदनशीलता यंदाची दिवाळी आपण निराधार व वंचिताना भेट देवून साजरी करावी या उद्देशाने त्यांनी शहरासह नायगाव येथील निराधारांना दिवाळीची भेट देत दिवाळीच्या पर्वास सुरवात केली. तहसील कार्यालयात निराधार योजनेत हयातीचा दाखला सादर करण्यास आलेल्या वृद्ध लाभार्थींना दिवाळी भेट म्हणून नवीन वस्त्र देत आगळी-वेगळी दिवाळी साजरी केली.

तहसीलदारांची संवेदनशीलता
यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची यावल येथील पहिलीच दिवाळी आहे व दिवाळी साजरी करताना समाजाप्रती असलेली संवेदनशीलता त्यांनी दाखवली आहे. यावल तालुक्यातील नायगाव तसेच शहरातील निराधार बालकांना त्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन भेटवस्तू दिल्या व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. निराधार, वंचित कुटूंबाकडे स्वत : जावुन त्यांनी संबधीत कुटुंबांशी हितगुज केले. आपण समाजाप्रती देणं लागतो या भावनेतून समाजातील गरजूंना या दिवाळीचा आनंद आपण दिला पाहिजे या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले.


अनपेक्षीत या स्वागत सत्काराने वृध्द भारावले
यावल तहसील कार्यालयामध्ये संजय निराधार योजनेतील एक लाभार्थी आपल्या हयातीचा दाखला देण्यासाठी कार्यालयात आला होता आणि तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना दिसला. संबधीत वृध्दाच्या अंगावरील शर्ट हा फाटलेला होता ते पाहून त्यांनी स्वतःच त्यांना आपल्या दालनात बोलावले व तेथे तात्काळ नवीन कपडे मागवलेे व कपडे भेट देवून वृध्दास मिठाई खाऊ घातली हे पाहुन वृध्द इसम भारावले. एकूणच तहसीलदारांनी अशा पद्धतीने एक आगळ्यावेगळ्या प्रकारे दिवाळीच्या शुभेच्छा समाजातील गरजूंना दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !