गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी पोलिस पाटलांकडून प्रयत्न आवश्यक : तहसीलदार मोहनमाला नाझीरकर


यावल : प्रत्येक गावातील पोलिस पाटलांनी गाव पातळीवर किरकोळ वादविवाद आणि भांडण तंटे मिटवले पाहिजे आणि ते मिटवतांना पोलिस प्रशासनाची मदत घ्यावी, ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची आपल्यावर आहे ती आपण अचूक पार पाळावी, अशा सूचना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केल्या. या यावल तहसील कार्यालयाच्या सभागृहात नवनियुक्त कोतवाल व पोलिस पाटील यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होत्या. तज्ज्ञ प्रशिक्षक मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले. यावल तहसील कार्यालयाच्या सभागृहात नवनियुक्त कोतवाल आणि पोलिस पाटील यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

जवाबदारीबाबत मार्गदर्शन
प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी मार्गदर्शन करतांना ग्रामीण भागातील प्रशासनाचे कान, नाक व डोळे म्हणून कोतवाल व पोलिस पाटील यांची भूमिका असते. गाव पातळीवर निर्माण होणार्‍या विविध समस्या, भांडण तंटे हे पोलिस पाटलांनी पुढाकार घेऊन मिटवले पाहिजे. भांडण तंटे मिटवत असताना आपल्या गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. या कार्यशाळेत उपस्थित कोतवाल, पोलिस पाटील यांनी कामकाज कसे केले पाहिजे. आपल्यावर असलेली जबाबदारी आपण कशा पद्धतीने पार पाडली पाहिजे. त्यासाठी काय-काय काम करावे लागते व कुठे आपण दक्षता घेतली पाहिजे याबाबत सखोल मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शक मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी केले. प्रोजेक्टरच्या माध्यमातून या उपस्थितींना माहिती देण्यात आली. प्रसंगी तालुक्यातील सर्व कोतवाल आणि पोलिस पाटील उपस्थित होते.


प्रोजेक्टरच्या माध्यमातून कामकाजाच्या टिप्स
कामकाजाचे नियोजन कसे करावे, कामकाज करत असतांना त्याच्या प्रशासकिय पातळीवर नोंदी कशा घ्यायच्या याबाबत प्रोजेक्टरच्या माध्यमातून टिप्स देण्यात आल्या व अनेकांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. या ठिकाणी उपस्थित कोतवाल आणि पोलिस पाटील यांच्या शंकांचे निरसन तज्ञ मार्गदर्शक मंडळाधिकारी सचिन जगताप यांनी केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !