अंधाराचे मळभ झाले दूर : दिवाळीत भुसावळात पथदिव्यांसह हायमास्टचा लखलखाट


Darkness fades away : Highmasts twinkle with streetlights in Diwali haze भुसावळ : शहरात गणेशोत्सवाच्या काळात अनेक पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती मात्र पालिकेने आता नवीन कंत्राटदाराला काम दिल्याने शहरातील हायमास्टसह पथदिव्यांची दुरुस्ती पूर्णत्वाकडे आल्याने दिवाळीत शहरात लखलखाट झाल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

नागरीकांमधून समाधान
पालिकेने नवीन कंत्राटदाराला काम दिल्यानंतर शहरातील सेंट्रल पोलला केबल टाकण्यात आल्यानंतर 90 टक्के लाईट सुरू झाले आहेत शिवाय शंभरावर हायमास्टची दुरुस्ती करण्यात आल्याने शहरातील अंधाराचे मळभ दूर झाले आहे. शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवरील सेंट्रल पोलची दुरुस्तीचे काम झाल्यानंतर नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रकाशाचा व आनंदाच्या सणात शहरात अंधाराचे साम्राज्य भेदले गेल्याने पालिकेविषयीदेखील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांनी नगरपालिका व महावितरणच्या सर्व अधिकार्‍यांची बैठक घेवून महावितरणला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पथदिव्यांच्या दुरुस्तीप्रसंगी कंत्राटदार प्रणय चौधरी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !