एमएसीसीआय शासकीय समन्वय समिती को.चेअरमनपदी राजेंद्र चौधरी
भुसावळ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या शासकीय समन्वय तज्ञ समितीच्या को.चेअरमनपदी भुसावळ येथील राजेंद्र पुंडलिक चौधरी यांनी नियुक्ती करण्यात आली.
शासकीय समन्वय समितीवर स्थानिक लोकप्रतिनिधींशी (खासदार, आमदार, महापौर) यांच्यासह चांगले संबंध ठेवणे, व्यापार व उद्योगाशी निगडीत असलेल्या स्थानिक संघटना यांच्याशी संपर्क स्थापित करणे, स्थानिक व्यापारी संस्थांसोबत त्रैमासिक बैठक घेणे, व्यापार्यांच्या समस्यांची यादी निराकरण करण्यास मदत करणे ही करणे, संबंधित प्राधिकरणाकडे योग्य तो पाठपुरावा करणे, समस्यांचे निराकरण करण्यास मदत करणे ही जवाबदारी चौधरी यांच्यावर असेल. याबाबतचे पत्र ललित गांधी यांनी दिले आहे.







