भुसावळात स्वरचैतन्याने बहरली दिवाळी पहाट
सुरेल भावगीतांनी श्रोते मंत्रमुग्ध : मातृभुमी प्रतिष्ठानच्या उपक्रमाला दाद
The dawn of Diwali blossomed with vocal consciousness in Bhusawal भुसावळ : शहरातील जय मातृभूमी प्रतिष्ठानने मातृभूमी चौकात रविवारी दिवाळीनिमित्ताने सुरांची सोनसकाळ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले. सुरेल भावगीतांनी दिवाळी पहाट आनंददायी केली. भावगितांसह मराठी हिंदीतील सुरेल गितांनी स्वरचैतन्य निर्माण केल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले. मातृभुमी प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आमदार संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, प्रा.सुनील नेवे, माजी नगसेवक युवराज लोणारी, अरुण धांडे, प्रशांत पाटील, किरण महाजन आदींच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते, शालिनी कोलते आदींची उपस्थिती होते.
भावगीताने जिंकली मने
वठू माऊली तू माऊली जगाची, प्रभाती सुर रंगले, गोंधळ मांडला भवनी गोंधळाला या आदींसह विविध भावगीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. बाल गायिका काव्या पवार हिने सुंदर आवाजात विठू माऊली तू माऊली जगाची हे भावगीत गावून उपस्थितांची मने जिंकली. आर्केस्ट्रा स्वर प्रणयचे संचालक जय सोनवणे, संचालक दिनेश ठाकू, गायिका सुरभी गौड, मयुर मारे, कुणाल वाकोडे, अविनाश ठाकूर आदींनी सुरेल गायन केले. गोपाळ पाटील यांनी बासरी वादन केले तर विशाल वानखेडे यांनी किबोर्डवर साथ दिली.


मातृभुमी प्रतिष्ठानचे नितीन नंदवणे, किशोर कोलते, सचिन बर्हाटे, तेजस झांबरे, मुकेश मोरे, पिंटू बर्हाटे, राजू चौधरी, पंकज शहा, विक्की कातंगडे,गोलू वारके, पंकज कोलते, पप्पू राणे, आमोद बर्हाटे आदींसह सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.
साईबाबांची आरास लक्षवेधी
‘दीपावली… मेरे साई के हाथो मे जादू का पानी’ या गीतांवर साईबाबांच्या वेशभूषेतील सजीव आरास साकारण्यात आली. या सजीव आरासमुळे व्यासपीठावर साक्षात साईबाबा अवतरल्याचा आभास झाला. गायक कृणाल वाकाडे व सहकार्यांनी गायीलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.





