प्रकल्पाला विरोध नाही मात्र मागण्या पूर्ण होईस्तोवर माघार नाही : भुसावळात मेधा पाटकर
पिंप्रीसेकम आंदोलनाबाबत तोडगा नाहीच : अधिकार्यांसोबतची चर्चा ठरली निष्फळ
There is no opposition to the project but no retreat until the demands are met : Medha Patkar in Bhusawal भुसावळ : दीपनगरातील नवीन प्रकल्पाला विरोध नाही मात्र त्यामुळे प्रदूषण होणार असून ही बाब नाकारता येणार नाही, 183 दिवसांपासून आंदोलन सुरू असताना त्याबाबत अद्यापही ठोस तोडगा काढता आलेला नसल्याने आता मागण्यांच्या पूर्ततेशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही व चंद्रपूर दौर्यानंतर पुन्हा येथे येवून आपण आंदोलन करणार असल्याचे नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी अधिकार्यांना खडसावून सांगितले. दीपनगर प्रकल्पाच्या रॉ वॉटर केंद्रासमोर गेल्या 15 मे पासून ठिय्या आंदोलन सुरू असून सोमवारी नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी भेट दिली. दुपारी तीन वाजेनंतर दीपनगर औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड व 660 मेगावॅट प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी भेट देत चर्चा केली मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आगामी काळात आंदोलन चिखळण्याची शक्यता वाढली आहे.
या मागण्यांसाठी आंदोलन
शेतीसाठी होणारे भारनियमन रद्द करावे तसेच सर्वे नंबर 205 ची जागा गावठाकडे हस्तांतरीत करावी, नोव्हेंबर 2012 मध्ये तत्कालीन उर्जामंत्री अजितत पवार यांच्या बैठकीत आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनानुसार गावाला स्कूल बस, रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी व अन्य मागण्यांसाठी पिंप्रीसेकम येथील शेतकर्यांनी तब्बल 183 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पिंप्रीसेकम शिवारात केवळ 24 तास वीजपुरवठा सुरू असताना 1 मे पासून केवळ आठ तास वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याने पूर्ववत 24 तास वीज मिळावी, विविध मागण्यांची पूर्तता करावी या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवले आहे.


अधिकारी व मेधा पाटकर यांच्यातील चर्चेमध्ये वारंवार मुद्दे भरकटत गेल्याने तोडगा निघाला नाही. दीपनगर केंद्राच्या अधिकार्यांनी प्रदूषण होत नसल्याचे सांगितले. यावर मेघा पाटकर यांनी प्रदूषणाचा प्रश्न आपण नाकारू शकत नसल्याचे सांगितले. यावर आंदोलक व अधिकार्यांमध्ये बर्याच मुद्दयांवर वाद झाले, मात्र तोडगा निघाला नाही.





