यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून डंपर चोरीचा प्रयत्न
Attempt to steal dumper from Yaval Tehsil office premises यावल : यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेले डंपर चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. हा डंपर चोरी करून येथून पळवण्यात आले मात्र हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अज्ञात चोट्याने डंपर तहसीलच्या दक्षिणेस असलेल्या पाण्याच्या टाकी खाली सोडून पळ काढला. याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध डंपर चोरीचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
यावल येथे सातोद रस्त्यावर तहसील कार्यालय असून या तहसील कार्यालयांमध्ये अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर (क्रमांक एम.एच.40 वाय. 0519) हे पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने डंपर येथून पळवले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने डंपर हे तहसील कार्यालयाच्या दक्षिणेस असलेल्या पाण्याच्या टाकीखाली लावून तिथून पळ काढला. याप्रकरणी यावल पोलिसात कोतवाल सोनूसिंग सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध डंपर चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार राजेंद्र पवार करीत आहे.
