दीपनगर प्रकल्पात उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू
Worker dies after falling from height in Deepnagar project भुसावळ : दीपनगर 660 प्रकल्पात उंचावरून पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हेतराज केशरी राठोड (48, महुदा वॉर्ड नंबर सहा ठाणा, जि.अनुपूर, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दीपनगर 660 प्रकल्पात काम करीत असलेले हेतराज राठोड हे उंचावरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना जळगाव व तेथून भोपाळ येथील हमिदीया हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले होेते मात्र उपचारादरम्यान त्यांची नुकतीच प्राणज्योत मालवली. याबाबतचे कागदपत्रे भुसावळ तालुका पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.



