भुसावळात कोळी समाजाचा वधू-वर मेळावा : 300 विवाहोच्छुकांचा परीचय


Bride and groom gathering of Koli community in Bhusawal: Introduction of 300 aspirants
भुसावळ :
शहरातील गजानन महाराज नगरातील कोळी समाज सभागृहात रविवार, 19 रोजी कोळी समाज विकास मंडळ भुसावळ अंतर्गत राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर परीचय मेळावा झाला. यावेळी राज्यभरातून आलेल्या सुमारे 300 वधू-वरांनी आपला परीचय दिला. महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परीषदेचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे, उद्योजक गोपाळ तायडे आदींच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, अकोला, धुळे येथून आलेले समाजबांधव उपस्थित होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर वधूवर परीचय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी, प्रभाकर सोनवणे (जळगाव), प्रभाकर सोनवणे (यावल), जितेंद्र सपकाळे, संजय कांडेलकर, पद्दमाकर कोळी, नितीन सपकाळे, नितीन कांडेलकर, पुंडलिक सोनवणे, सुनीता तायडे, पुष्पा कोळी, अमित सोळुंके, सतीश सपकाळे, प्रल्हाद सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, नितीन सोनवणे, लखीचंद बाविस्कर, डॉ.दिवाकर पाटील, पन्नालाल सोनवणे, भिकन कोळी मान्यवर उपस्थित होते.


उपोषणार्थी समाजबांधवांचा सन्मान
जात प्रमाणपत्रासाठी अन्नत्याग उपोषण आंदोलन करणार्‍या सुनीता तायडे, पुष्पा कोळी, जगन्नाथ बाविस्कर, संजय कांडेलकर, पद्माकर कोळी, नितीन सपकाळे, नितीन कांडेलकर, पुंडलिक सोनवणे यांचा आदिवासी कोळी समाजभूषण पुरस्कार व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अमित सोळुंके यांची प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. चेतन पाटील यांनी जगातले सर्वात उंच शटर तयार केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. तेजश्री सोनवणे हिचा डॉ. डि. वाय. पाटिल युनिव्हर्सिटी पुणे विद्यापीठात बीएएमएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

मेळावा यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष नितिन सोनवणे, अभिमन्यू सोनवणे (मामा), वसंत सपकाळे, शांताराम सपकाळे, दिपक सोनवणे, भागवत सपकाळे, दत्तात्रय सपकाळे, विजय तावडे, रोहिदास सोनवणे, लखीचंद बाविस्कर, लक्ष्मण पिंप्रीकर, महारु कोळी, रवींद्र बाविस्कर, उत्तम कोळी, धर्मा कोळी, प्रदीप सपकाळे,आनंदा दोडे, नारायण कोळी, नारायण तायडे आदींनी परीश्रम घेतले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !