अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे सातपुड्यात 375 जणांना फराळासह नवीन कपडे वाटप

चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य : सातपुड्यातील नागादेवी येथे राबविला उपक्रम


भुसावळ : शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे यावल तालुक्यातील नागादेवी, आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात 127 कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, पुरुषांना कपडे, ब्लँकेट, अंघोळीचे रुमाल, स्वेटर, फराळ, शैक्षणिक साहित्य, पणत्या, बिस्किट, चॉकलेट आणि यांचे वाटप करण्यात आले. दीपोत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद तर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गोड करू या’ असे आवाहन करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत गोळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील नागादेवी येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आले. यंदा उपक्रमाचे आठवे वर्ष होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रकल्प प्रमुख जीवन महाजन, समन्वयक प्रदीप सोनवणे, सहसमन्वयक समाधान जाधव, योगेश इंगळे यांच्यासह डॉ.संजू भटकर, प्रसन्ना बोरोले, शैलेंद्र महाजन, प्रा.श्याम दुसाने, अमितकुमार पाटील, ज्ञानेश्वर घुले, अमित चौधरी, कुंदन वायकोळे, राहुल भारंबे, राजू वारके, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, हितेंद्र नेमाडे, अतुल चौधरी, केतन महाजन, ललित महाजन, दीपक जावळे, विपीन वारके, उमेश फिरके, संदीप पाटील (सावखेडा), किशोर सोनवणे, विनोद सोनवणे, चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ.रवींद्र माळी, वर्षा अहिरराव, भारती ठाकरे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य
अंतर्नादतर्फे गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

उपक्रमाला मिळाले व्यापक स्वरुप
‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जोरदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे या उपक्रमास व्यापक स्वरुप मिळाले आहे. भविष्यात हा उपक्रम लोकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्प प्रमुख जीवन महाजन, समन्वयक प्रदीप सोनवणे, तर सह समन्वय समाधान जाधव, योगेश इंगळे यांनी दिली. शहरी लोक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा आनंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !