भुसावळ पालिकेच्या जीर्ण इमारतीवर उद्या पडणार हातोडा : लवकरच शहरातील अतिक्रमण निघणार !

प्रशासक जितेंद्र पाटलील यांची माहिती : 18 दुकानदारांना 48 तासांचा अल्टीमेटम : अतिक्रमण मोहिमेबाबत नियोजन


The hammer will fall on the dilapidated building of Bhusawal Municipality tomorrow: encroachment will be removed from the city soon! भुसावळ : भुसावळ पालिकेची जीर्ण ईमारत स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये पाडण्याची सूचना करण्यात आल्यानंतरही पाच वर्ष चालढकल करण्यात आली होती मात्र पालिका प्रशासनाने या जीर्ण इमारतीवर हातोडा मारण्याचा निर्णय घेतला असून पालिका इमारतीच्या आवारातील सुमारे 18 दुकानदारांना नोटीसा बजावून 48 तासांचा अल्टीमेटम देण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा प्रशासक जितेंद्र पाटील यांनी दिली. या शिवाय शहरातील जीर्ण इमारतीदेखील गुरुवारपासून पालिकेमार्फत पाडण्यात येतील, अशी माहिती प्रशासकांनी दिली तर त्याच्या पुढच्या टप्प्यात शहरातील अतिक्रमणदेखील हटवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

84 जीर्ण इमारतींवर बुलडोझर फिरणार
भुसावळ शहरातील विविध भागात तब्बल 84 जीर्ण इमारती आहेत मात्र या इमारती पाडल्या जात नसल्याने रहिवासी नागरीकांसह वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने गुरुवार, 23 पासून पालिकेच्या जीर्ण इमारतीसह शहरातील अन्य जीर्ण इमारतींवर बुलडोझर फिरवले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी पाटील यांनी दिली.


पालिकेच्या जीर्ण इमारतीवर पडणार हातोडा
पालिकेचे रेल्वे स्टेशन परीसरातील ब्रिटीशकालीन इमारतीमध्ये कामकाज सुरू होते. 2018 मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले. यात ही इमारत धोकेदायक असल्याचे निष्पन्न झाल्याने पालिकेचे कामकाज गोपाळनगर संकूल व सांस्कृतीक हॉलमध्ये स्थलांतरीत झाले मात्र ही जीर्ण इमारत उभी असल्याने त्यामुळे धोका निर्माण झाल्याची भीती ओळखून व आगामी काळात आपत्ती निर्माण होऊ नये म्हणून पालिका इमारतीच्या दर्शनी भागात असलेल्या सुमारे 18 दुकानदारांना दुकाने खाली करण्याची नोटीस बजावण्यात येत असून 48 तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. गुरुवारनंतर या जीर्ण इमारतीवर हातोडा पडणार असल्याचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगत शहरातील अन्य 84 इमारतीदेखील पाडण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

लवकरच शहरातील अतिक्रमणही हटवणार
दिवाळीच्या काळात पालिकेने करवसूली व अतिक्रमण हटाव मोहिम थांबवली होती मात्र आता दिवाळीनंतर पालिकेकडून कराची थकबाकी वसुली मोहिम सुरू केली जात असून या कारवाईसोबतच अतिक्रमण हटाव मोहिम देखील राबवली जाईल, असेही प्रांताधिकारी पाटील यांनी यावेळी सांगितले.

गाळे धारकांचे अवैध वास्तव्य :प्रांताधिकारी
नगरपालिकेच्या जीर्ण इमारतीतील गाळे धारकांची मुदत तीन वर्षांपूर्वीच संपली असून त्यांनी यापूर्वीच आपली पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. अवैध पद्धत्तीने गाळे धारक या इमारतीत वास्तव्य करीत असून सर्वांना पालिकेतर्फे नोटीसा बजावण्यात येत असून आपल्या उपस्थितीत गुरुवारी जीर्ण इमारत पाडण्यात येईल, असे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले. पालिकेचा आता वसुलीवर भर थकबाकीदारांविरोधात मोहिम राबवण्यात येत असून लवकरच शहरातील अतिक्रमण हटवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !