रब्बी हंगामाकरीता हतनूर कालव्यातून आवर्तन सोडावे : भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळेंची मागणी
Awartan should be left from Hatnoor canal for Rabi season : BJP district president Amol Jawalen’s demand यावल : यंदाच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत. त्यांना रब्बी पिकांच्या पेरणीस पाण्याची कमतरता होवू नये याकरीता हतनूर कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी तापी पाटबंधारे विभाग जळगाव कार्यालयात दिले आहे.
पावसाअभावी हंगाम धोक्यात
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी तापी पाटबंधारे विभाग, जळगाव येथे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या परीसरातील शेतकर्यांच्या रब्बी हंगामाकरीता हतनूर कालव्याला लवकरात लवकर आवर्तन सोडावे म्हणून लेखी स्वरूपात निवेदन देत पाणी लवकर सोडावे जेणेकरून शेतकरी बांधवांच्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकर्यांनी आपल्या शेतात रब्बी पिकांची पेरणीस सुरुवात केलेली आहे परंतु यावर्षी जळगाव जिल्ह्यात बर्याच ठिकाणी पावसाळ्यात हवा त्या प्रमाणात पाउस झाला नसल्या कारणाने शेतकर्यांना यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.


नुकसान भरून निघावे तसेच शेतकर्यांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी हतनूर धरणाच्या उजव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी तापी पाटबांधारे विकास महामंडळ जळगावचे मुख्य अभियंता बोरकर यांच्याकडे केली आहे.





