संजय गांधी योजनेच्या लाभार्थींना हयातीचे दाखले गावातील तलाठी कार्यालयात सादर करा : तहसीलदारांच्या सूचना


यावल : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना आपापल्या हयातीचा दाखल तहसील कार्यालयात आणून देण्याऐवजी तो आपापल्या गावातील तलाठी कार्यालयात जमा करावा, अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत. हयातीचा दाखला सादर करण्याकरीता गोर-गरीब लाभार्थी दररोज ग्रामीण भागातून यावल येेत होते मात्र आता ही अडचण आता दूर होणार आहे.

तहसील कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही
दरवर्षी प्रशासनाकडून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थीकडून हयातीचा दाखला घेतला जातो व हा दाखल सादर करण्याकरीता सध्या येथील तहसील कार्यालयात लाभार्थींची गर्दी होत आहे. ग्रामीण भागातून लाभार्थी शहरात दाखला जमा करण्याकरीता मोठ्या संख्येत येत होते. नागरीकांची तालुक्यावर येण्याची अडचण तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दूर केली आहे. संजय गांधी योजनेतील वृद्ध, अपंग आणि अत्यवस्थ लाभार्थी यांनी हयातीचे प्रमाणपत्र देण्याकरीता तहसील कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. संबंधित व्यक्तींनी आपले हयातीचे प्रमाणपत्र संबंधित गावाचे तलाठी यांच्याकडे द्यावेत, अशा सूचना तहसीलदारांनी काढल्या आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !