सरपंच पदावरील गावाचा सर्वांगीण विकास करावा : संदीप सोनवणे


यावल : यावल तालुक्यातील शिरागड-पथराडे या गावातील विकासकामांना गती द्यावी व सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य यांना काही अडचणी आल्यास आपण सहकार्य करू, असे आश्वासन सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सोेनवणे यांनी दिले. ते शिरागड ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच व सदस्यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
शिरागड येथील ग्रामपंचायत सभागृहात लोकनियुक्त सरपंच योगीता सोनवणे, सदस्य प्रताप सोनवणे, निलेश सोळंके, आशा सोळंके, रवींद्र सोळंके या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार समारंभ संदीपभैय्या सोनवणे मित्र परीवारामार्फत आयोजीत करण्यात आला. मार्गदर्शन करतांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा वढोदा सरपंच संदीप सोनवणे यांनी शिरागड – पथराडे ग्रुपग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण गावाचा विकास घडवावा तसेच आपणास काही अडचणी आल्यास आपण सदैव मदतीला सोबत राहू, असे आश्वासन दिले. यावेळी पोलिस पाटील सुधाकर सोळंके, भिका सोळंके, महारु सोळंके, योगराज सोळंके, सुधाकर कोळी, जितेद्र कोळी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !