भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची राष्ट्रवादीच्या रावेर मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड


Former mayor of Bhusawal Umesh Nemade was elected as the district president of Raver constituency of NCP भुसावळ : भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश कालिदास नेमाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी गुरुवारी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने उमेश नेमाडे यांची रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

पक्ष संघटनेला मिळणार बळकटी : मंत्री अनिल पाटील
पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमाडे यांचे सहकार्य राहील, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. यावेळी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रवींद्र नाना पाटील, गुणवंत नीळ आदी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !