भोरगाव लेवा पंचायतीतर्फे सामूहिक विवाहचे आयोजन


भुसावळ : भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे यंदाही सलग आठव्या वर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या सामूहिक विवाहातदेखील वधू-वरांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण केले जाणार आहे. जानेवारी महिन्यात भुसावळ शहरात हा सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे कुटुंबनायक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठव्यांदा सामूहिक विवाह घेण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यात होणार मेळावा
नवीन वर्षाच्या सुरवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात हा विवाह सोहळा होणार आहे. त्यासाठी वधू-वरांची नावे नोंदणी सुरू झाली आहे. ज्यांचे विवाह निश्चित झाले आहेत अशा वधू-वरांनी आधार कार्डची व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स कॉपी घेऊन व नोंदणी करायची आहे. वधू-वरांना लग्न लागल्यावर गॅस शेगडी, सिलेंडर, आंदण, मिक्सर, कुकर, संसार उपयोगी वस्तू, वधुवरांना शालू, कपडे व मंगळसूत्र, जोडवी असे सौभाग्य अलंकार देण्यात येणार आहे. लग्नात होणार्‍या अनावश्यक खर्चाला आळा बसावा व समाजातील अनावश्यक खर्चिक पध्दती बंद व्हायला हव्यात म्हणून हा सामूहिक विवाह सोहळा करण्यात येतो. विवाह निश्चित झालेल्या वधू-वरांनी 15 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन सचिव डॉ.बाळू पाटील, प्रोजेक्ट चेअरमन आरती चौधरी यांच्याशी संपर्क करावा आवाहन अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !