पंतप्रधानांच्या सुरक्षेतील हलगर्जी भोवली : पोलिस अधीक्षकांसह सात अधिकारी निलंबित

Prime Minister’s security breached: Seven officers including Superintendent of Police suspended नवी दिल्ली : पंजाब दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीनंतर मोठी टिकेची झोड उठली होती. 5 जानेवारी 2022 रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी तब्बल वर्षभरानंतर पोलिस अधीक्षकांसह सात अधिकारी व कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. फिरोजपूर जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक आणि दोन डीएसपी दर्जाच्या अधिकार्यांना निलंबित करण्यात आले.
ताफा अडकला : सुदैवाने अप्रिय घटना टळली
पंतप्रधान दौर्यावर असतानाच शेतकरी आंदोलकांनी केलेल्या नाकाबंदीमुळे पीएम यांचा ताफा सुमारे 20 मिनिटे उड्डाणपुलावरच अडकला व या हलगर्जीपणाबद्दल भाजप नेत्यांनी तत्कालीन चरणजीत सिंह चन्नी सरकारला लक्ष्य केले शिवाय पंतप्रधानांच्या प्रवासात शेवटच्या क्षणी बदल झाल्याचे काँग्रेसने म्हटले होते. सुरक्षा भंगासंदर्भात चौकशी करणासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने सुरक्षा भंगासाठी पंजाब सरकारच्या काही अधिकार्यांना जबाबदार धरले होते. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने आता या चुकीबद्दल सात पोलिस अधिकार्यांना निलंबित केले आहे.
या अधिकार्यांवर निलंबन कारवाई
तत्कालीन फिरोजपूर पोलिस प्रमुख तथा आता भटिंडाचे एसपी गुरबिंदर सिंग यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले व राज्याच्या गृहविभागाच्या आदेशानुसार, डीएसपी दर्जाचे अधिकारी पारसन सिंग आणि जगदीश कुमार, पोलिस निरीक्षक जतिंदर सिंग आणि बलविंदर सिंग, उपनिरीक्षक जसवंत सिंग आणि सहायक उपनिरीक्षक रमेश कुमार यांनाही निलंबित करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
