भुसावळात कोष्टी समाजाचा वधू-वर परीचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
दिडशे वधू-वरांची नोंदणी : राज्यभरातून समाजबांधव उपस्थित
भुसावळ : शहरातील कोळी समाज मंगल कार्यालयात लिंगायत कोष्टी समाजाचा वधू-वर परीचय मेळावा झाला. या मेळाव्यात 150 वधू-वरांची नोंद करण्यात आली. मेळाव्यासाठी राज्यभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील वधू-वर उच्चशिक्षीत असून लग्नासाठीच्या अपेक्षा पाहता त्यात कुठेतरी तडजोड आवश्यक आहे. बाह्यरूपाऐवजी अनुरूप जोडीदाराला प्राधान्य दिल्यास संसार निश्चित सुखाचा होईल, असा आशावाद मेळाव्याचे अध्यक्ष रवींद्र कोष्टी यांनी व्यक्त केला.
यांची मेळाव्याप्रसंगी उपस्थिती
मेळाव्याचे उद्घाटन माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले. व्यासपीठावर सेवानिवृत्त अवर सचिव प्रमोद कानडे, आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी राजेंद्र लवणे, आदर्श शिक्षक गौरवांकित अजय अडिकने, ग्लोबल एचसीएल टेक्नॉलॉजीजचे प्रमुख आणि संचालक हेमंत कोष्टी उपस्थित होते. यावेळी सहायक सरकारी अभियोक्ता या पदावर निवड झालेल्या अॅड.वृशाली उमराणे कोष्टी, बँक ऑफ इंडियाचे एस.डब्लु.ओ.सुषमा तपकिरे, मोहन क्षिरसागर यांचीही उपस्थिती होती. राजेंद्र लवणे यानीं . वधू-वर सूची पुस्तिकेद्वारे अनेक विवाह जुळत असल्याचे सांगितले. प्रमोद कानडे, अजय अडिकने, सुषमा तपकिरे, अॅड.वृशाली उमराणे कोष्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. विनयकुमार कोष्टी यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांचा परीचय सरोज कोष्टी, सोनाली कोष्टी, माधुरी गरुडे, अभिषेक घोडके, दीपक कोंगे यांनी दिला. माधव गरूडे यांनी आभार मानले.


यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मुकेश कोष्टी, उपाध्यक्ष दीपक कोष्टी, कोषाध्यक्ष दीपक विनंते, सतीश घोडके, संजय खोडके, दिनकर सरोदे, अॅड.सचिन कोष्टी, रवींद्र कोष्टी, महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठानचे स्वप्नील कोंगे, अमोल कोष्टी, अविनाश सरोदे, मयुर कानडे, अभिजीत साकळीकर व महिला मंडळाच्या प्रतिभा घोडके, ज्योती कोष्टी, प्रीती विनंते, वर्षा खोडके, नलिनी कानडे, पल्लवी कोष्टी, प्राची भदाडे, सुनीता विनंते आदी महिला सदस्यांचे सहकार्य लाभले.





