भुसावळ विभागात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम : शाळा-महाविद्यालयांसह संस्था, संघटनांतर्फे कार्यक्रमाचे आयोजन


भुसावळ : भारतीय संविधान दिनानिमित्त शहर व परीसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळा-महाविद्यालयांसह संस्था, संघटनांतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर संविधान प्रास्ताविकेचेदेखील वाचन करण्यात आले. भारतीय राज्य घटनेच्या इतिहासाची माहिती मान्यवरांनी मनोगतातून दिली.

भालोद महाविद्यालय
भालोद : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी याप्रसंगी आपल्या मनोगतातून भारतीय राज्यघटनेचा इतिहास, भारतीय राज्यघटना कशी निर्माण झाली, राज्यघटना तयार करण्यास किती दिवस लागले, घटना समितीमध्ये कोण कोण सदस्य होते याबद्दल सविस्तर विवेचन केले. भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट असलेल्या मूलभूत हक्कांविषयी, मूलभूत कर्तव्यांविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती त्यांनी दिली. भारतीय राज्यघटनेतील विविध कलमे, प्रकरणे, परीशिष्ट याविषयी संदर्भासह स्पष्टीकरण दिले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना का म्हटले जाते, याविषयीचे स्पष्टीकरण प्रा. सुनील नेवे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिले तसेच भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनी भारतीय राज्यघटनेचे पालन करावे असे आवाहन याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. भारतीय राज्यघटनेची जी उद्देश पत्रिका आहे त्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन याप्रसंगी केले. प्रा.डॉ.डी.एल.सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती. प्रा.डॉ.दिनेश पाटील, प्रा.डॉ.पद्माकर सावळे, प्रा.डॉ.अजय कोल्हे, प्रा.डॉ.दिनेश महाजन, प्रा.डॉ.मीनाक्षी वाघुळदे, प्रा.दिलीप चौधरी, प्रा.योगीता चौधरी, तुळशीराम पाटील, चंद्रकांत लोखंडे, दिलीप इंगळे, रूपम बेंडाळे, कल्याण चौधरी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, प्रा.डॉ. जतीन मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली व असंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


एन.के.नारखेडे स्कुल
भुसावळ : एन.के.नारखेडे स्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त ऑनररी जॉईट सेंकेटरी प्रमोद नेमाडे यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या. शिक्षिका वंदना कोल्हे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूल्ये, मूलभूत तत्वे आदींची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डीआरम कार्यालय
भुसावळ : डीआरएम कार्यालयात संविधान दिनानिमित्त मंडल रेल प्रबंधक इती पांडे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले आणि त्यांच्या मागे सर्व उपस्थितानी सामुदायिक वाचन केले. अपर मंडल रेल प्रबंधक सुनील कुमार सुमन, कौशलेंद्र कुमार, वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.एस.काजी, सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे, सुनील परदेशी, बनारसीलाल जैसवार आदींसह अधिकारी उपस्थित होते.

फेकरीत संविधानाला अभिवादन
भुसावळ : तालुक्यातील फेकरी येथील संविधान नगरात भारताच्या संविधानाला अभिवादन करण्यात आले. आनंद छापानीमोहन यांनी संविधानाचे महत्त्व कथन केले. राजू इंगळे, सुभाष तायडे, पल्लवी गुडचळ यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मनीषा जाधव, पंचफुला छापानी मोहन, लता जाधव, भाविका खंडारे, राधा खंडारे, शीला दांडेकर, सुरेंद्र हिवाळे, देवराम जाधव, तेजस जाधव, मनोहर दांडेकर, शशिकांत खंडारे, जगदीश इंगळे, निलेश कांबळे, तेजोराव नाईक, सचिन वानखेडे, बोधिसत्व गुडचळ, राजहंस खंडारे, सौंदर्य खंडारे, मोहित बागुल यांची उपस्थिती होती. संस्कृती नगर आणि लक्ष्मी लॉन्समधील वॉर्डाला सर्वांनी मिळून संविधान नगर बोर्ड लावून नामकरण केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !