वधू-वर मेळावे काळाची गरज : भुसावळात पालकमंत्री गुलाबराव पाटील
भुसावळ येथे राज्यस्तरीय धोबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात : राज्यभरातून बांधवांची उपस्थिती
Need of time for bride-groom meeting : Guardian Minister Gulabrao Patil in Bhusawal भुसावळ : डॉ.बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मस्तकात पुस्तक गेले पाहिजे आणि पुस्तक मस्तकात गेल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही. शिक्षण हे महत्वाच्यास्थानी येवून बसले आहे. मुलगा असो की मुलगी शिक्षणामध्ये अग्रेसर असले पाहिजे. आज आपण बघतो की, शेतकर्यांच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही, अशी स्थिती आहे. वधू-वर मेळावे काळाजी गरज असल्याचे स्पष्ट मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ जळगाव व श्री संत गाडगे महाराज परीट (धोबी) सेवा संस्था, भुसावळ यांचा वतीने रविवार, 26 रोजी सभागृह लोकार्पण सोहळा व वधू-वर परीचय मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी समाजातील पदाधिकार्यांनी मान्यवरांचा सन्मान केला. समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा मंत्री पाटील व आमदार सावकारे यांच्यासह मान्यवरांनी सन्मान केला. अध्यक्षस्थाानी आमदार संजय सावकारे होते.
यांची मेळाव्याला उपस्थिती
कार्यक्रमास उत्तरप्रदेश लखनऊ येथील पीठाधीश्वर प.पू.अशोक महाराज, पालकमंत्री गुलाबराव पाटील, अ.भा. (धोबी) समाज राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे, उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ माजी प्रदेशाध्यक्ष विजयराव देसाई व प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, ज्येष्ठ मार्गदर्शक किसनराव जोर्वेकर, अ.भा. (धोबी) महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार मालविय, पुणे येथील माजी उपमहापौर सुरेशराव नाशिककर, संत गाडगेबाबा स्मारक बांधकाम समिती प्रदेशाध्यक्ष दिलीपराव शिंदे, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती किशोर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे यांनी प्रास्ताविक केले.


वधू-वर मेळावेल काळाची गरज -मंत्री गुलाबराव पाटील
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, समाजामध्ये स्वच्छता करण्याकरीता हा मेळावा आहे व राज्यामध्येही स्वच्छता व्हावी याकरीता मी मंत्री आहे. वधू-वर परीचय मेळावा काळाची गरज असून आता मुलींना हुंडा द्यावा लागत आहे. सध्या गडचिरोली, भंडारा, गोंदीया येथील मुली मुला वाल्यांना पसंत करीत आहेत. आता काळानुसार गोष्टी बदलत असतात.
व्यावसायीकाचाही व्हावा विचार : पालकमंत्री
बीबीसीच्या बातम्या एकणारे आता मोबाईलवरच पिक्चर बघायला लागले, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात एक हजार मुलांच्यामागे 859 मुली आहेत. 141 मुले साधू होतील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुलीच्या आईचा आग्रह असतो की मुलगा नोकरीवालाच पाहिजे. मात्र धंदेवाला चार लोकांचे पोट भरतो त्यामुळे त्याचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले. संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहिर करावी, अशी मागणी समाजाने केली असता मी आपला पोस्टमन आहे. निश्चितच मी आपले पत्र घेवून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणारा पहिला मंत्री असेल, असेही ते म्हणाले. आभार परीट धोबी समाज संस्थाध्यक्ष रमेश ठाकरे यांनी केले. यावेळी राज्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाची ताकद दाखवता आली पाहिजे : आमदार
पआमदार संजय सावकारे म्हणाले की, वधू-वर मेळावा घेतला म्हणजे समस्या संपल्या असे होत नाही. समाजाच्या समस्या काय आहेत. त्यावर उपाय काय आहेत. ते उपाय करण्याकरीता सगळ्या पदाधिकार्यांनी एकत्र येवून मंथन केले पाहिजे. जरी वेगवेगळ्या पक्षात काम करीत असले तरी सर्वांनी एकत्र येवून समाजाच्या समस्या सोडविल्या पाहिजे. आपल्या पक्षाचे विचार वेगवेगळे असू शकतात परंतु समाजाकरीता एक विचार असला पाहिजे. छोटा समाज असला तरी समाजाची ताकद दाखविली पाहिजे तरच तुमची किंमत होते. असे कार्यक्रम राज्याच्या विविध भागामध्ये झालेच पाहिजे तर कळेल हा समाज मोठा आहे. समाजाची संख्या मोठी आहे. ती फक्त विखूरली गेली आहे. समाजाची संख्या 30 लाख आहे. ती कमी समजू नका आणि स्वतःलाही कमी लेखू नका, असेही ते म्हणाले.





