आमदार एकनाथराव खडसेंचा भुसावळसह बोदवडला निषेध
मंत्री गिरीश महाजनांबद्दल अपशब्दानंतर प्रतिमेला मारले जोडे
MLA Eknathrao Khadse’s protest against Bhusawal and Bodwad भुसावळ : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा भुसावळस बोदवडमधील भाजपा पदाधिकार्यांनी निषेध व्यक्त करीत खडसेंच्या प्रतिमेला जोडे मारले.
बोदवड शहरातही वक्तव्याचा निषेध
बोदवड : आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, सर्व आघाड्या व प्रकोष्ट बोदवड तालुक्याच्या वतीने बोदवड शहरात टांगा स्टॅन्ड येथे निषेध करण्यात आला. भाजपा बोदवड तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, जळगाव जिल्हापूर्व सरचिटणीस वैशाली कुलकर्णी, युवा मोर्चा बोदवड शहराध्यक्ष अभिषेक झाबक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हापूर्व चिटणीस परमेश्वर टिकारे, जिल्हा कार्यकारीणी सदस्य भागवत चौधरी, जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा अनिता अग्रवाल, युवा मोर्चा जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष राम आहुजा, जळगाव जिल्हापूर्व अभियंता सेलचे जिल्हा संयोजक अमोल शिरपूरकर, बोदवड तालुका उपाध्यक्ष विक्रम पाटील, सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, बोदवड शहर सरचिटणीस वैभव माटे, युवा मोर्चा बोदवड शहर उपाध्यक्ष राहुल माळी व सागर गंगतीरे, बोदवड शहर संपर्क प्रमुख मधुकर पारधी, भाजपा विस्तारक उमेश गुरव, तालुका सोशल मीडिया प्रमुख रोहित अग्रवाल, सुनील आसटकर, संजय अग्रवाल, सुनील माळी, रोशन पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


भुसावळात प्रतिमेला मारले जोडे
भुसावळ : भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आक्षेपार्ह विधान केले. या विधानाचा निषेध म्हणून शहर भाजपने मंगळवारी नाहाटा महाविद्यालय चौफुलीवर खडसेंचा निषेध केला. या आंदोलनात भाजपचे प्रदेश चिटणीस अजय भोळे यांनी खडसेंच्या प्रतिमेला चप्पलांनी मारले. या आंदोलनाकडे मात्र शहर भाजपचे शहराध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी मात्र पाठ फिरवली. नाहाटा चौफुलीवर आंदोलन झाले. या आंदोलनात प्रदेश सचिव अजय भोळे, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, प्रदेश ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी प्रवीण इखनकर, ग्रामीण विभागाचे सरचिटणीस दिलीप कोळी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष पवन बुंदेले, शंकर शेळके, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष राहूल तायडे, रवी ढगे, प्रशांत देवकर, धनराज बाविस्कर, संतोष फोकळ, चेतन सावकारे आदींसह 20 ते 22 कार्यकर्ते व पदाधिकारी होते.
माजी नगरसेवकांनी फिरवली पाठ
भाजपच्या आंदोलनात मोजके पदाधिकारी व मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. अवघ्या काही वेळेत हे आंदोलन थमले. शहरात भाजपचे 28 माजी नगरसेवक आहेत मात्र एकानेही हजेरी दिली नाही त्यामुळे भाजपच्या पदाधिकार्यांमध्ये अद्यापही आमदार खडसेंविषयी प्रेम कायम असल्याचे यातून दिसून आले.





