खडसे वाट्टेल ते बोलतात ; आता कागदोपत्री सामोरे जावे ! : मंत्री गिरीश महाजन


Khadse Wattel they speak ; Now deal with the paperwork ! : Minister Girish Mahajan भुसावळ : आमदार एकनाथराव खडसे यांची मानसिकता सध्या ठिक नसल्याने ते वाट्टेल तशी बडबड करीत आहेत त्यामुळे त्यांनी आता यापुढे कागदोपत्री जे जे होईल त्याला सामोरे जावे, असा सूचक इशारा वजा मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी येथे व्यक्त केले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौर्‍यानिमित्त ते भुसावळात आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. आमदार एकनाथराव खडसे यांनी अद्याप गिरीश महाजनांविषयी कमरेखालचे बोललेलो नाही, अशी टिका केल्यानंतर त्यांनी आमदार खडसेंवरही टिकेचे बाण चालवले.

 


खडसेंनी आता कागदोपत्री सामोरे जावे
आमदार खडसेंच्या टिकेला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आमदार एकनाथराव खडसे यांची मानसिकता सध्या ठिक नसल्याने वाट्टेल तशी ते बडबड करीत आहेत. आता त्यांनी जे कागदोपत्री होईल त्याला सामोरे जावे. सर्व जनतेची भाजपाला मतदान करून मोदींना पंतप्रधान करण्याची मानसिकता असल्याचेही ते म्हणाले.
रावेर लोकसभेच्या उमेदवारीबाबत कुठलीही येथे चर्चा झाली नाही मात्र जो उमेदवार असेल त्याला किमान रावेर लोकसभेत चार लाखांचा तर जळगावातील उमेदवाराला पाच लाखांचा लीड मिळेल, असे ते म्हणाले.

खासदार संजय राऊतांवर उपचाराची गरज

खासदार संजय राऊत यांनी सरकार कोसळण्याबाबत केलेल्या विधानावर मंत्री महाजन म्हणाले की, राऊतांवर उपचार करण्याची आवश्यकता आहे. ते वाचाळवीर असून भपंक प्रसिद्धीसाठी ते हे सर्व करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावात केलेल्या टिकेवरही त्यांनी जयंत पाटील यांनी आधी आपला पक्ष सांभाळण्याचा सल्ला दिला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !