दुचाकींच्या ओव्हर स्पीडमुळे सर्वाधिक अपघात : अपघातात पुणे प्रथम तर जळगाव पाचव्या स्थानी
राष्ट्रीय महामार्गाचे एडीजी रवींद्रकुमार सिंगल : वाहतूक पोलिस स्थानकाचे उद्घाटन
Most accidents due to over speeding of two-wheelers: Pune ranks first and Jalgaon ranks fifth जळगाव : राज्यात सर्वाधिक अपघातत दुचाकींच्या ओव्हर स्पीडमुळे होतात व महामार्गावरील अपघाताच्या प्रमाणात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अपघातात मृत्यू होणार्यांच्या संख्येत राज्यात पुणे प्रथम तर, नाशिक, नगर सोलापूर, व जळगाव हे अनुक्रमे दुसर्या, तिसर्या, चौथ्या पाचव्या स्थानी असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे एडीजी रवींद्रकुमार सिंगल म्हणाले. जळगावच्या पारधी नगरात राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिस स्थानकाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. यावेळी ठाणे पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व डीवायएसपी मोराळे उपस्थित होते.
पाच जिल्ह्यात अपघात थांबवण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत
एडीजी रवींद्रकुमार सिंगल म्हणाले की, अपघाताच्या सर्वाधिक प्रमाणात पुणे प्रथम क्रमांकावर तर नाशिक दोन, नगर तीन नंबर तर चौथ्या स्थानी सोलापूर व पाचव्या स्थानी जळगाव येते. सामाजिक संस्थांच्या मदतीने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यात पुणे 923 नाशिक 912 नगर 841 सोलापूर 864 जळगाव 552 अपघातांमध्ये मृत्यू झालेले आहेत.


दुचाकी अपघातात सात हजार 700 जणांचा मृत्यू
मोटरसायकल अपघात सर्वाधिक जास्त आहेत. मागील वर्षी 1524 अपघात झाले होते. त्यामध्ये 7700 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. 2021 पासून मृत्युंजय दूत योजना सुरू केली आहे. यामध्ये राज्यात 3600 मृत्युंजय दूत झालेले आहेत. भारतात रस्ते अपघातात 2021 मध्ये एक लाख 53 हजार नागरीकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.





