मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात तीन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी


Three shops at Pravartan Chowk in Muktainagar were gutted by fire मुक्ताईनगर : शहरातील अत्यंत गजबजलेल्या प्रवर्तन चौकातील दुकानांना गुरुवारी रात्री अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. आगीचे स्पष्ट कारण मात्र कळू शकले नाही.

अचानक लागली आग
परीवर्तन चौकालगतच दोन ते तीन दुकानांना गुरुवारी रात्री अचानक आग लागली. या दुकानांमधून आगीचे लोळ उठतांना दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. बूट व चप्पल चे दुकान तसेच गोळी-बिस्किट पान मसाल्याचे दुकान व किराण्याचे दुकान या आगीत जळाले.

दरम्यान, नागरीकांनी प्रयत्नांची शर्थ केल्यामुळे अग्निशमन पथकाची गाडी येण्यापूर्वीच आग आटोक्यात आली. तथापि, या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत मदतकार्य केले. ही आग नेमकी कशामुळे लागली ? याची माहिती मिळाली नाही.


कॉपी करू नका.