यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीत उपसरपंच निवड
तीन ठिकाणी चुरस तर सात ठिकाणी बिनविरोध निवड
यावल : यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीत गुरूवारी उपसरपंच निवडीचा कार्यक्रम झाला. त्या-त्या ग्रामपंचायतीत निवड प्रक्रीया राबवण्यात आली. यात कोळन्हावी, गाडर्या व गिरडगाव या तीन ग्रामपंचायतीत सुरशीची लढत बघायला मिळाली तर उर्वरीत सात ठिकाणी मात्र उपसरपंच निवड बिनविरोध पार पडली. निवडीनंतर सत्ताधारी गटाकडून जल्लोष करण्यात आला.
सात ठिकाणी उपसरपंच निवड बिनविरोध
यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या व गुरूवारी या सर्व ग्रामपंचायतीत लोक नियुक्त सरपंचांनी पदभार स्विकारत त्यांची पहिली सभा पार पडली. या सभेतच उपसरपंच निवडणूक घेण्यात आली. यात सर्व ग्रामपंचायतीत सकाळपासून गर्दी होती. विविध गटांकडून मोर्चो बांधणी तसेच बिनविरोध निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांना मनवणे, रूसवे, फुगवे दुर करण्याचे काम सुरू होते. यात सात ग्रामपंचातयतीत यश मिळाले व तेथील उपसरपंच निवड बिनविरोध झाली मात्र कोळन्हावी, गाड्र्या व गिरडगाव या तीन ग्रामपंचायतीत चुरशीची लढत बघायला मिळाली. तीन्ही ठिकाणी केवळ एका मताच्या फरकाने उपसरपंच निवडून आले.


साकळीत लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच फकरूद्यीन शौकतखान कुरेशी, किनगाव खुर्द लोकनियुक्त सरपंच रूपाली कोळी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच वैशाली संजय पाटील, बोराळे लोकनियुक्त सरपंच संध्या राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच दीपाली खिलचंद चौधरी, बोरखेडा खुर्द लोकनियुक्त सरपंच अकीला तडवी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच इकबाल बाबू तडवी, शिरागड लोकनियुक्त सरपंच योगिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच रेखा ज्ञानेश्वर कोळी, थोरगव्हाण लोकनियुक्त सरपंच मनीषा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सुर्यभान चावदास पाटील, म्हैसवाडी लोकनियुक्त सरपंच सुनील चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच सपना राहुल चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
एका मताच्या फरकाने विजय
कोळन्हावी लोकनियुक्त सरपंच विकास सोळंके यांच्या अध्यक्षते खाली उपसरपंच निवडीत विलास नामदेव सोळंके यांनी सहा मते मिळाल तर समाधान बाजीराव सोनवणे यांना पाच मते मिळाल्याने सोळंके यांची निवड झाली. गिरडगाव लोकनियुक्त सरपंच आशा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली शकीला उमर तडवी यांनी चार मत मिळवले तर किशोर गुलाब पाटील यांना तीन मते मिळाल्याने तडवी यांची निवड करण्यात आली. गाड्र्या लोकनियुक्त सरपंच मोतीसिंग बारेला यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीत फुलसिंग किसन बारेला यांना पाच तर लक्ष्मीबाई बारेला यांना चार मते मिळाल्याने फुलसिंग बारेला यांना विजयी घोषित करण्यात आले.





