मिझोरममधील निवडणुकीचा निकाल 3 ऐवजी 4 डिसेंबरला
Election results in Mizoram on 4th December instead of 3rd नवी दिल्ली : मिझोरममध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती मात्र आता ही मतमोजणी 4 डिसेंबरला होईल तर अन्य चार राज्यात ठरलेल्या दिवशीच मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
रविवार हा ख्रिश्चनांसाठी पवित्र दिवस असल्याचे या पक्षांचे म्हणणे होते. यामुळे ख्रिश्चनबहुल मिझोरममध्ये मतमोजणीची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी केली जात होते. यावर स्थानिक पक्ष आणी भाजपा, काँग्रेस या सर्वच पक्षांची संमती होती. अखेर निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करत मतमोजणी एक दिवसाने पुढे ढकलली आहे. या पक्षांनी आयोगाला एक पत्रही लिहिले होते. यानुसार मिझोरममध्ये रविवारी कोणताही कार्यक्रम आयोजित केला जात नाही, असेही म्हटले होते.




मिझोरममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान झाले होते परंतू याची मतमोजणी चार राज्यांसोबतच ठेवण्यात आली होती. मतदानाच्या जवळपास महिनाभराने ही मतमोजणी होणार आहे. याआधी निवडणूक आयोगाने राजस्थानमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीची तारीखही बदलली होती.