ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणार : आमदार मंगेश चव्हाण

आमदार उवाच : खडसेंच्या काळात तोट्यात गेलेला दुध संघ नफ्यात : आक्रोश मोर्चा केवळ खडसे परीवारासाठीच


Will demand a thorough investigation into the Lalit Patil case : MLA Mangesh Chavan जळगाव : आमदार एकनाथ खडसे दूध संघात असताना आठ महिन्यांत सुमारे 9 कोटी 60 लाख रुपये तोटा झाला होता मात्र आम्ही सत्तेत आल्यापासून दूध संघाला दर महिन्याला नफा झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. दूध दराविषयी माहिती देण्यासाठी शनिवार, 2 डिसेंबर रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, या पत्रकार परीषदेनंतर आमदार चव्हाण यांनी खडसेंवर टिकेचे बाण चालवले. ललित पाटील प्रकरणाची चौकशीची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले शिवाय जळगावातील आक्रोश मोर्चा हा शेतकर्‍यांसाठी नव्हे तर खडसे परीवारासाठी होता, असेही ते म्हणाले.

अनुदानाची मागणी शासनाकडे करणार
आमदार चव्हाण म्हणाले की, जळगावात शेतकर्‍यांना दूध संघ 34.60 रुपये दर देत होता, आता हेच दर 30.60 रुपये दिले जात आहे. हे दर परवडणरे नसल्याने दूध संघ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना फरक म्हणून 50 पैसे देण्याच्या विचारात आहे. तसेच राज्यातील दुग्ध व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे देखील लिटरमागे 2 रुपयांचे अनुदान देण्याची मागणी करणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. जळगाव जिल्हा दूध संघ शेतकर्‍यांना देत असलेले दर राज्यातील इतर मोठ्या दूध संघांपेक्षा जास्त असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत संचालक रोहित निकम, कार्यकारी संचालक शैलेश मोरखेडे उपस्थित होते.


तो मोर्चा खडसेंच्या परीवारासाठी
खडसेंनी गौण खनिज उत्खननात मोठा गैरव्यवहार केला आहे त्यामुळे त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष करावे यासाठी खडसेंनी शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा काढला मात्र, त्यातला आक्रोश शेतकर्‍यांचा नव्हे तर यातून वाचण्यासाठी एकनाथ खडसेंचा होता, अशा खोचक टिकाही आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !