लोकसभा निवडणुकीत भाजपाला 340 जागांवर यश : मंत्री गिरीश महाजन


BJP won 340 seats in Lok Sabha elections: Minister Girish Mahajan मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 340 जागांवर विजयी होईल, असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी झालेल्या परीक्षेत भाजपने मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या तीन राज्यात चांगले यश मिळवले असून मतदारांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखविला आहे. या राज्यातील जनतेने देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर विकास कामांवर शिक्कामोर्तब केले आहे. या राज्यात मिळालेले यश हे चांगले असून मोठ्या अंतराने भाजपने तीन राज्यात विजय मिळविला आहे. तेलंगणा राज्यात पक्षाची संघटना आणि या राज्यात भाजपचे कामही नव्हते यामुळे तेलंगणातून काही मोठी अपेक्षा नव्हती. तरीही भाजपने चांगली कामगिरी केल्याचे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ठाकरे गटाला आव्हान : एकतरी खासदार निवडून दाखवा
2019 च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचे 18 खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहर्‍यामुळे निवडून आले मात्र आगामी लोकसभेत ठाकरे गटाने महाराष्ट्रात एक तरी खासदार निवडून आणून दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. पुढच्या वेळी तेलंगणातही चांगले काम करून हे राज्यही भाजपमय करण्याचा प्रयत्न राहील, असेही मंत्री महाजन म्हणाले.


देश की पणोती तर राहुल गांधी
गिरीश महाजन यांनी राहुल गांधीवर टीका केली. ते म्हणाले की या विजयाने देश की पनौती कोण आहे ? हे सिद्ध केले आहे. देशाची पनौती ही राहुल गांधी आहेत. तर देशाची गॅरेंटी ही नरेंद्र मोदी आहेत. ईव्हीएमवर टीका होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की. टीका करणार्‍यांना नाचता येईना आंगण वाकडे अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !