देशाला जाती-जातीत विभागण्याचा प्रयत्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी


Attempt to divide the country into castes : Prime Minister Narendra Modi नवी दिल्ली : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या जनतेने भाजपाला एकहाती सत्ता दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपा मुख्यालयात स्वागत झाले. यावेळी संबोधित करताना ते म्ळणाले की, या निवडणुकीत देशाला जातींमध्ये विभागण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र आपण केवळ देशात फक्त चार जाती सर्वात मोठ्या असल्याचे म्हणालो होतो. स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि आपली गरीब कुटुंबे या सर्वात मोठ्या जाती आहेत. या चार जातींना सशक्त करून देश सशक्त होणार आहे.

प्रत्येक गरीबाला निवडणूक जिंकल्याचा विश्वास
पंतप्रधान म्हणाले की, आज प्रत्येक गरीब माणूस म्हणतोय की तो स्वतः निवडणूक जिंकला आहे. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक वंचित आणि आदिवासी बंधू-भगिनी या विचाराने आनंदी आहेत की हा विजय आपण ज्याला मतदान केले त्याचाच आहे. माझे पहिले मतच माझ्या विजयाचे कारण ठरले, असे पहिल्यांदाच मतदार सांगत आहेत. या विजयात प्रत्येक महिला आपला विजय पाहत आहे.





शंभर टक्के आश्वासने पूर्ण करणार
या निवडणुकीत भाजपच्या विजयाची जबाबदारी देशाच्या भगिनींनी घेतली होती. आज मी त्यांना नम्रपणे सांगेन की, भाजपने तुम्हाला दिलेली आश्वासने 100 टक्के पूर्ण होतील आणि ही मोदींची हमी आहे. आणि मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी. देशातील तरुण पिढीला फक्त विकास हवा आहे. ज्या सरकारांनी तरुणांच्या विरोधात काम केले त्यांना सत्तेतून बाद केले आहे. छत्तीसगड असो, राजस्थान असो वा तेलंगणा. भाजपचे सरकार युवास्नेही आहे, हे देशातील तरुणांना माहीत आहे. त्यातून तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत. देशातील आदिवासी समाजही आपले मत उघडपणे मांडत आहे. हाच समाज काँग्रेसच्या धोरणांमुळे मागे पडला होता. त्यांना संधी दिली गेली नाही.

गुंतवणूकदारांचा विश्वास वाढणार
या निवडणुकीच्या निकालामुळे भारताच्या विकासावर जगाचा विश्वास आणखी दृढ होणार आहे. गुंतवणूकदारांनाही विश्वास देईल. विकसित भारतासाठी आपण घेतलेल्या संकल्पाला लोकांचे आशीर्वाद सातत्याने मिळत आहेत. भारताची लोकशाही आणि मतदार किती परिपक्व आहेत हे जग पाहत आहे. आज जग पाहत आहे की भारतातील लोक पूर्ण बहुमतासाठी आणि स्थिर सरकारसाठी विचारपूर्वक मतदान करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !