भुसावळातील दिनेश इखारे यांचा भारत भूषण पुरस्काराने सन्मान


भुसावळ : भुसावळातील वंचित बहुजन संघटनेचे कार्यकर्ता दिनेश रामदास इखारे यांना अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या सन्माननीय मान्यवरांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्यासह कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल तसेच आरोग्य शिबिर व गोरगरीबांना मदतीचा हात देण्यात इखारे यांची नेहमीच मोलाची भूमिका राहिल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘भारत भूषण पुरस्कारा’ने सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, संगीता बियाणी, राजू सूर्यवंशी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !