दीपनगर औष्णिक विद्युतकेंद्रास राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार
भुसावळ : नवी दिल्ली येथे ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील मानाचा राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार 2023 यंदा भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रास प्रदान करण्यात आला. आपल्या अनुभवी आणि कुशल सक्षम नेतृत्वात ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवनवीन किर्ती स्थापन करणारे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वीज वापर आणि वीज बचत या संदर्भातील नियोजनासाठी औष्णिक विद्युत केंद्रामधील संपूर्ण अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार यांचे पुरस्कारात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.







